बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. ओळख क्रिकेटपटूंची
Written By राकेश रासकर|

शॉन पोलॉक

नाव : शॉन मॅक्लेन पोलॉक
जन्म : १६ जुलै १९७3
जन्म ठिकाण : पोर्ट एलिझाबेथ
देश : दक्षिण आफ्रिका
कसोटी पदार्पण : द. आफ्रिका वि. इंग्लंड, सेंच्युरिया, १९९५
वन डे पदार्पण : द. आफ्रिका वि. इंग्लंड, केपटाउन, १९९६
शैली : मध्यमगती गोलंदाज व उजव्या हाताचा फलंदाज

शॉन पोलॉक हा क्रिकेट जगतातील सध्याचा काळातील अव्वल अष्टपैलू खेळाडू आहे. एकदिवसीय सामन्यात ३०० बळी व ३००० धावा करणार्‍या थोड्या लोकांमध्ये त्याचा समावेश होतो. दक्षिण आफ्रिकेचे महान फलंदाज ग्रॅमी पोलॉक यांचा तो नातू.

एकदिवसीय क्रिकेट व कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेतर्फे सर्वांत जास्त बळी मिळवण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. अतिशय अचूक गोलंदाजी व मोक्याच्या क्षणी बळी मिळवण्यासाठी तो प्रसिध्द आहे. तो दक्षिण आफ्रिकेचा कर्णधारही होता.

मायदेशात २००३ साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत संघाच्या खराब कामगिरीमुळे त्याचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. कसोटीत सर्वांत जास्त बळी मिळवण्यात तो दहा्व्या कमांकावर आहे. आक्रमक फलंदाजीमुळे त्याने दक्षिण आफ्रिकेला अनेक सामने जिंकून दिले आहेत. २००३ साली त्याची विस्डेनतर्फे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली होती.

कसोटी
सामने - १०७
धावा - ३७८१
सरासरी - ३२.३१
सर्वोत्तम - १११
१००/५० - २/१६
बळी - ४१६
सर्वोत्तम - ७-८७
झेल - ७२


वन डे
सामने - २७३
धावा - २९६९
सरासरी - २४.९४
सर्वोत्तम - ७५
१००/५० - ११
बळी - ३६८
सर्वोत्तम - ६-३५
झेल - १०१