रेखा गुप्ता यांचा आज राज्याभिषेक, रामलीला मैदानावर होणार शपथविधी सोहळा, पंतप्रधान मोदींसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. यापूर्वी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली होती.
				  													
						
																							
									  				  				  
	मिळालेल्या माहितनुसार रेखा गुप्ता आज दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. आज दुपारी १२:३५ वाजता, दिल्लीचे उपराज्यपाल ऐतिहासिक रामलीला मैदानावर रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देतील. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्री देखील उपस्थित राहणार आहे. एनडीए शासित २० राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. धर्म, उद्योग, चित्रपट आणि क्रिकेट जगतातील व्यक्तींव्यतिरिक्त, १६,००० हून अधिक नागरिक शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार असतील. अशी माहिती समोर आली आहे. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  				  																								
											
									  
	
		मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन - रेखा गुप्ता
		
		शपथ घेण्यापूर्वी रेखा गुप्ता म्हणाल्या, "माझ्यावर एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एका साध्या कुटुंबातून आलेल्या माझ्यासारख्या मुलीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि उच्च नेतृत्वाचे आभार मानते. मी माझ्या सर्व क्षमता, शक्ती आणि प्रामाणिकपणाने ही जबाबदारी पार पाडेन."
 				  																	
									  				  																	
									  रेखा गुप्ता यांच्या पतीचे निवेदन
	दिल्लीच्या भावी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचे पती मनीष गुप्ता यांनी त्यांच्या पत्नीच्या शपथविधी समारंभापूर्वी सांगितले की, रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री होतील असे त्यांना कधीच वाटले नव्हते. त्यांना ते चमत्कारासारखे वाटते. पक्षाने आम्हाला इतका आदर दिला आहे ही त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे."
				  																	
									  
		Edited By- Dhanashri Naik