फराळाची पंगत
सौ. शोभना अनगळ
दिवाळीच्या दिवशी झाली गंमतताटात बसली फराळाची पंगत।करंजी म्हणते फुगले पोटशंकरपाळ्यांनी दुमडले ओठ।पिऊन पिऊन तूप झाली गालफुगीचिरोटेवर बसले पटदिशी उगी।चकली ताईंना आला सरसरून काटाहंसून म्हणतो अनारसा पेढे वाटा।तक्ररी आणि गार्हाणी ऐकून ऐकूनकडबोळे म्हणतो कान गेले विटून।गोल ढेरी सावरत लाडूराव आलेपाहुणे म्हणतात खाऊन खाऊन पोट फुगले।