शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रहण
Written By
Last Modified: सोमवार, 17 जानेवारी 2022 (23:42 IST)

Solar Eclipse 2022 : केव्हा, कधी आणि कोणत्या राशीत होणार आहे 2022 चे पहिले सूर्यग्रहण

Solar Eclipse 2022 : जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा त्याला सूर्यग्रहण म्हणतात. ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाची खगोलीय घटना म्हणून सूर्यग्रहणाकडे पाहिले जाते. असे मानले जाते की जेव्हा जेव्हा सूर्यग्रहण होते तेव्हा त्याचा प्रभाव देश आणि जगावर दिसून येतो, तसेच त्याचा प्रभाव मेष ते मीन राशीपर्यंत दिसून येतो.
 
सूर्यग्रहण २०२२ (Surya Grahan 2022) केव्हा आहे
ज्योतिष गणनेनुसार, पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल २०२२ रोजी होईल. हे वर्षातील पहिले ग्रहण असेल. वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे वृषभ राशीत होणारे आंशिक ग्रहण असेल. हे सूर्यग्रहण दक्षिण आणि पश्चिम-दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक आणि अंटार्क्टिक महासागर यांसारख्या भागातून दिसणार आहे. आंशिक असल्याने त्याचा भारतावर परिणाम होणार नाही. संपूर्ण ग्रहणाच्या बाबतीतच सुतक नियम पाळले जातात. पंचांगानुसार 2022 मध्ये एकूण चार ग्रहणे होणार आहेत. त्यापैकी दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहणांचा योगायोग आहे.
 
वर्षातील पहिले सूर्यग्रहण वृषभ राशीत
वर्षातील पहिले सूर्यग्रहण शनिवार, 30 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. हे ग्रहण दुपारी 12.15 वाजता सुरू होईल आणि 4:07 वाजता संपेल. हे सूर्यग्रहण वृषभ राशीत होणार आहे.
सूर्यग्रहणादरम्यान 'सुतक'ची स्थिती
हे वर्षातील पूर्ण सूर्यग्रहण नसून हे आंशिक सूर्यग्रहण आहे. त्यामुळे सुतक नियम पाळण्याची गरज भासणार नाही. मान्यतेनुसार जेव्हा पूर्ण ग्रहणाची स्थिती निर्माण होते तेव्हाच सुतक प्रभावी किंवा वैध ठरते.