शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ग्रहण
Written By वेबदुनिया|

सूर्यग्रहण कसे बघावे !

- सौ. भाग्यश्री कुलकर्णी

पूर्ण सूर्यग्रहण बघण्यापूर्वी त्याचे प्रतिबिंब बघावे. सुर्याच्या प्रतिमेला पिनहोलमधून भिंतीवर प्रतिबिंबीत करावे. एका छोट्या आरशाला कागदाच्या तुकड्याने झाका. त्यावर 1 ते 2 सें.मी.व्यासाचे छिद्र असावे. कागद लावलेल्या आरशाचा उपयोग सुर्याची प्रतिमा भिंतीवर प्रतिबिंबित करण्यासाठी करता येईल.

पांढर्‍या कागदावर/स्क्रीन/भिंतीवर सुर्याचे प्रतिबिंब पाहण्यासाठी छोटा टेलिस्कोप किंवा दुर्बिण वापरता येईल. पण ह्या उपकरणाचा एखादा भाग प्लास्टिकचा बनलेला असल्यास सुर्याच्या उष्णतेपासून त्यांचा बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. अंशत: लागलेले सुर्यग्रहण योग्य व प्रमाणित फिल्टरमधूनच पहावे. त्यासाठी गडद रंगाची (14 नंबरची) वेल्डींग काच चांगली. ग्रहण बघताना एकाच डोळ्याचा वापर करावा. वापरापूर्वी फिल्टरची तपासणी करावी. भोक पडलेला, फाटलेला फिल्टर वापरु नये. फिल्टरमधल्या फिल्मला बोटांनी स्पर्श करु नये अथवा फिल्म वाकवू नये. कारण त्या फिल्मवरच्या बारीकशा ओरखड्यानेही डोळ्याला इजा होऊ शकते. ग्रहण बघताना जवळ अनुभवी व्यक्ती हवी.

हे करू नये:
सुर्याला अंशीक किंवा पुर्ण ग्रहणकाळात नुसत्या डोळ्यांनी बघु नये.
टेलीस्कोप किंवा दुर्बिणीतून सुर्याला पाहू नये.( वस्तुत: ग्रहण बघताना ह्या उपकरणाची गरज नाही.)
अशा फिल्मचा वापर करू नये ज्यामुळे सुर्याच्या दृश्य तीव्रतेवर परिणाम होईल.
सुर्यकिरणांपैकी 52%इंफ्रारेड किरणे असतात त्यामुळे डोळे खराब होतात.
धुराने काळी केलेली काच, रंगीत फिल्म, सनग्लास, नॉन सिल्वर ब्लॅक व्हाइट फिल्म, फोटोग्राफिक न्युट्रल डेंसीटी फिल्टर किंवा पोलरायजींग फिल्टरचा वापर करू नये.ते सुरक्षित नाहीत. डोळ्यावर लावता येणा-या स्वस्तातल्या बाजारु टेलिस्कोप बरोबर मिळणा-या सौरफिल्टरचाही वापर करू नये.
रंगीत पाण्यात सुर्याचे प्रतिबिंबही पाहू नये.
ग्रहणदशेचे अवलोकन सतत न करता थोड्याथोड्यावेळाने काही सेकंद पहावे.