- वृत्त-जगत
» - आज-काल
» - मागोवा 2012
2012 टॉप 10 गॅझेट्स
यंदाच्या वर्षात काही अद्ययावत अशी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणेही आली. बर्लिनमधील आयफा 2012 या कंझ्युमर इलेक्ट्रानिक ट्रेड शोमध्ये अशा उपकरणांचे प्रदर्शन करण्यात आले होते. यंदाच्या वर्षातील अशा टॉप टेन गॅझेट्सची ही माहिती....
1. सॅमसंग गॅलक्सी नोट 2
सॅमसंगच्या लोकप्रिय गॅलक्सी नोटचे हे आधुनिक व्हर्जन. त्यात 5.5 इंच सुपरअमोलेड एचडी स्क्रीन, अँड्रॉईड एच डी स्क्रीन, अँड्रॉईड जेलीबीन आणि एस पेन ही वैशिष्टये होती. 8 एमपी रिअर कॅमेरा हे आणखी एक वैशिष्टय.
2.
लिनोव्हा आयडियाटॅब एस 2110 हे टॅबलेट कीबोर्ड डॉकला अॅटॅच होऊ शकते. त्यामुळे ग्राहकाला टॅब्लेट आणि नोटबुकची चॉईस करता येईल. या टॅबलेटमध्ये 10.1 इंचाचे आयपीऊस एलसीडी डिस्प्ले असून, त्याची टेन फिंगर टचस्क्रीन क्षमता आहे. त्यात 1 जीबी एलपी-डीडीआर2 मेमेरी आहे. बॅटरी दहा तास चालू शकते.
3.
सोनी एक्सपेरिया टी सोनी कंपनीने एक्सपेरिया स्मार्टफोनची नवी आवृत्ती आणली. त्यात दोन मॉडेल्स होते. एक्सपेरिया टीमध्ये 4.6 इंचाचा स्क्रीनल 1.5 जीएचडेझ ड्युअल कोअर प्रोसेसर आणि 13 एमपी कॅमेरा ही वैशिष्टये होती. एक्सपेरिया व्ही हे मॉडेल थोडे लहान आहे.
4.
एचटीसी डिझायर एक्स
एचटीसीने त्यांच्या डिझायर मालिकेतील नवे मॉडेल आणले. डिझायर एक्स मध्ये 4 इंचाचा सुपर एलसीडी डब्ल्यू व्हीजीए 800 बाय 400 आकाराचा स्क्रीन, 1 जीएचझेड प्रोसेसर आणि 76 8 जीबीची रॅम अशी वैशिष्ट्ये होती. यात 5 एमपीचा कॅमेराही आहे.
5.
हिअरचा नवा फ्रीज
हिअर कंपनीने नवा ट्रान्सपरन्ट, इंटरॅक्टिव्ह फ्रीज आणला. हा फ्रीज सध्या प्रोटोटाईप म्हणूनच तयार करण्यात आला आहे. या उंच फ्रीजमध्ये अनेक वैशिष्टये आहेत. त्याचे महत्वाचे वैशिष्टय म्हणजे तो पारदर्शक असून, दरवाजा न उघडताच आतमध्ये काय काय आहे, हे ग्राहकाला पाहता येऊ शकते.
6.
सोनीचा 84 इंची टीव्ही
सोनी कंपनीने 84 इंची टीव्ही लोकांसमोर आणला. त्यामध्ये तब्बल 4,096 बाय 3,072 पिक्सेल्स आहेत. एखाद्या नॉर्मल एचडीच्या तुलनेत ही क्षमता चारपट अधिक आहे. या टीव्हीमध्ये थ्रिडी कपॅसिटीही आहे.
7.
डेल एक्स पी एस 10,12,27
ही तिनही उपरकणे विंडोज 8 साठी डिझाईन करण्यात आली आहेत. त्यात हातात सामावू शकणार्या दहा इंचाच्या टॅब्लेट एक्सपीएस10 पासून एक्सपीएस27पर्यंतचा समावेश आहे.
8.
एलजीचा 'एल9' एलजीच्या 'एल' मालिकेतील 'एल9' प्रदर्शित करण्यात आला. त्यात 4.7 इंच आयपीएस पॅनेल डिस्प्ले, 1 जीएचझेड प्रोसेसर, 1 जीबी रॅम, कॅमेरा आदी वैशिष्ट्ये होती.
9.
सॅमसंग गॅलेक्झी कॅमेरा