मंगळवार, 28 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. फादर्स डे
Written By
Last Updated : रविवार, 15 जून 2025 (09:48 IST)

Father's Day 2025 Wishes From Son मुलाकडून वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा

Heart touching fathers day wishes from Son in marathi
प्रत्येक खुशी प्रत्येक क्षण साथ असतो,
जेव्हा डोक्यावर वडिलांचा हात असतो.
हॅपी फादर्स डे!
आपल्या संकटांवर निधड्या छातीने मात करणाऱ्या,
आपल्या भवितव्यासाठी कष्टाची चार हात करणाऱ्या व्यक्तीस 
हॅपी फादर्स डे!
 
तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार
माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात 
तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे
हॅपी फादर्स डे!
 
माझे पहिले शिक्षक,
अखंड प्रेरणास्थान आणि प्रिय मित्र असणाऱ्या 
महान वडिलांना पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
माझी ओळख आहात तुम्ही
तुमच्यामुळे मी आज या जगात आहे
मी जे काही आहे ते तुमच्यामुळे. 
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा .
तुम्ही कितीही मोठे झाला तरीही
असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही
मोठा माणूस म्हणूनच पाहणार 
आणि तो म्हणजे बाबा
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही,
माझ्या वाडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही.
हॅपी फादर्स डे!
 
आयुष्य जगण्याची खरी मजा तर 
वडिलांकडून मागितलेल्या एक रुपयात होती 
आपल्या कमाईत तर आवशक्यता देखील पूर्ण होत नाही..!
 
बाप असतो तेल वात,
जळत असतो क्षणाक्षणाला,
हाडांची कडे करून,
आधार देतो मनामनाला..
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
बाबा, तुम्ही मला जगण्याची कला शिकवली 
योग्य मार्गदर्शन व दिशा दिली; 
तुमच्या उपस्थितीमुळे माझे जीवन संपूर्ण झाले. 
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
बाबा! तू माझा हिरो आहेस.
हॅपी फादर्स डे!
 
तुमचा प्रत्येक दिवस आनंद आणि प्रेमाने भरलेला असो
नेहमी माझ्यासोबत असता त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
माझ्या सर्वोत्कृष्ट बाबांना
हॅपी फादर्स डे!