गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई आर्टीकल
Written By वेबदुनिया|

लकी बांबू - उन्नतीचे प्रतीक

घर व कार्यालयाची सजावट करण्यासाठी बाजारात विविध प्रकारची शोभेची फुलझाडे उपलब्ध आहेत. त्यात 'लकी' बांबूला महत्त्वाचे स्थान आहे. घराच्या सौंदर्यात भर घालाणारा 'लकी बांबू' उन्नती, सौभाग्याचेही प्रतीक मानला जातो.

पारदर्शी काचेच्या भांड्यात ठेवण्यात येणारे बांबूचे रोपटे विविध प्रकारच्या आकारात आपल्याला दिसतात. या रोपट्याचा विशेष म्हणजे मातीचा उपयोग न करता केवळ पाण्यावर त्याला जगवता येते. शक्यतो लकी बांबूला काचेच्या भांड्यात पाणी घालून ठेवले जाते.

लकी बांबूचे रोपटे हे केवळ पाण्यावर स्वस्थ ठेवता येते. पाण्यावरच मोठे होणार्‍या या डेकोरेटीव्ह रोपट्याला छानशी हिरवी पालवी फुटत असते. बांबूच्या बारीक बारीक काड्या एकत्र बांधून बंडल करून त्याला विविध प्रकारचे आकार दिले जातात. त्यामुळे लकी बांबूची किंमत त्याच्या आकारावरून ठरवली जात असते.

लकी बांबूचे रोपटे हे 'ड्रेसीना' जातीतले आहे. शास्त्रीय भाषेत त्याला 'ड्रेसीना सेंडेरियाना' असे म्हटले जाते.

भारतात 'ड्रेसीना सेंडेरियाना' नाहीत. त्यामुळे हे रोपटे बॅंकॉक येथून आयात केले जाते. 'लकी बांबू'ची वाढ सुरळीत होण्यासाठी केवळ त्याला सूर्याच्या सरळ येणार्‍या किरणाची गरज भासते. बाथरूममध्येही या रोपट्याला लावता येते. घर व कार्यालयात एका कोपर्‍यात ठेवलेले लकी बांबू सगळ्याना आकर्षित करत असते.

लकी बांबू रोपट्याची वर्षभरात केवळ तीन ते चार इंचाने वाढ होते. त्यामुळे त्याची फारशी काळजी घेण्याची आवश्यकता नसते. आज बाजारात विविध प्रकारचे बांबू उपलब्ध झालेले आहेत. लहान मुले किंवा प्राणी यांना या रोपट्यापासून कुठल्याच प्रकारची इजा होत नाही.

लकी बांबू घर किंवा ऑफिसमध्ये वातावरणनिर्मिती तयार करत असते. तसेच त्यांना त्याला उन्नती तसेच विकासाचे प्रतीक मानले आहे. लकी बांबूमुळे काम करत असताना आपल्यात निर्माण होणार तणाव दूर होतो तसेच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

त्रिकोणी, पिरामिड, ड्रेगनच्या आकारात बाजाराम लकी बांबू उपलब्ध होतात. रोपटे जितके जुने तेवढी त्याची किंमत अधिक असते. बांबूचे मुळ म्हणजेच त्याच्या गाठीवरून ते रोपटे किती जुने आहे, याची कल्पना येते.

70 रुपयापासून तर 50 हजार रुपयापर्यंत लकी बांबूच्या किंमती असतात.