रविवार, 21 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. आगामी चित्रपट
Written By
Last Modified: शनिवार, 30 जुलै 2016 (18:09 IST)

सलमानसोबत दीपिका ‘टय़ुबलाइट’मध्ये

salman dipika
अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच अभिनेता सलमान खानसोबत त्याच्या आगामी ‘टय़ुबलाइट’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. सलमान खानच्या बहुचर्चित ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खान ‘टय़ुबलाइट’ या चित्रपटाचेही दिग्दर्शन करणार आहे. हा चित्रपट कबीरचा आतापर्यंतचा सर्वाधिक महत्त्वाकांक्षी चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाच्या निमित्ताने सलमान खान पहिल्यांदाच लडाख येथे शूटिंग करत आहे. हॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या तयारीत व्यस्त असणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान खानसह एकाच चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे.