PR |
1990मध्ये अमिताभ बच्चनला घेऊन करण जौहरचे वडील यश जौहरने ‘अग्निपथ’ नावाचे चित्रपट तयार केले होते. अमिताभाला उत्कृष्ट अभिनयासाठी श्रेष्ठ कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता पण बॉक्स ऑफिसवर हे चित्रपट फ्लॉप राहिले, लोकांनी नंतर या चित्रपटाला व्हिडिओ आणि टीव्हीवर बघितल्यानंतर त्याची तारीफ केली. आता 22 वर्षांनंतर करण जौहरने या चित्रपटाचा रीमेक तयार केला असून त्यात थोडे फार बदल केले आहे.
PR |
मांडवा नावाच्या एका लहान गावात राहणारा विजय दीनानाथ चौहान (ऋत्विक रोशन)ला त्याच्या वडिलांनी आदर्श, सिद्धांत आणि ईमानदारीच्या गोष्ट्या शिकवल्या होत्या. विजयच्या जीवनात तेव्हा तुफान येतो तेव्हा ड्रग डीलर कांचा (संजय दत्त) त्याच्या वडिलांची हत्या करतो. आपल्या आई सोबत विजय मुंबईत येतो. आता त्याच्या जीवनाचा एकच उद्देश्य आहे की मांडवा परतून आपल्या वडिलांवर लागलेले डाग दूर करायचे जे कांचाने त्यांच्यावर लावले आहे.
PR |
मुंबईत 12 वर्षीय विजयचे जीवन लाइनवर लावण्याची जबाबदारी रऊफ लाला (ऋषी कपूर) घेतो. कांचापर्यंत पोहोचण्याच्या यात्रेत विजय बरेच नियम आणि कायदे तोडतो. त्याचे बरेच संबंध बनतात आणि बिघडतातही. विजयला प्रत्येक वेळेस त्याची मैत्रीण काली (प्रियंका चोप्रा)चा साथ मिळतो. पंधरा वर्षांनंतर विजयची कांचाच्या प्रती घृणा त्याला मांडवापर्यंत घेऊन जाते, जेथे ते दोघेही आमोरासमोर असतात.