मंगळवार, 6 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

अजब प्रेम की गजब कहानी

रणबीर कपूर
IFM
IFM
निर्माता : रमेश एस. तौरानी
दिग्दर्शक: राजकुमार संतोषी
संगीत : प्रीतम
कलाकार : रणबीर कपूर, कैटरीना कैफ, उपेन पटेल, दर्शन जरीवाला, असरानी, गोविंद नामदेव, स्मिता जयकर, जगदीप, जाकिर हुसैन, सलमान खान (विशेष भूमिका)

आयुष्य मजेत जगायचं हा प्रेमचा (रणबीर कपूर) फंडा आहे. स्वतः आनंदित रहायचे आणि इतरांनाही खुश ठेवायचे हा अशा जगण्याचा त्याचा मार्ग आहे. पण त्याचा हा फंडा त्याला स्वतःलाच अनेक अडचणींमध्ये अडकवतो.

या सगळ्या अडचणीत त्याचा जीव जेनिफरशी (कैटरीना कैफ) जडतो. त्यानंतर त्याचे आयुष्य पार बदलून जाते. मग तो ही 'रिकामी कामे' सोडून काही तरी कामधंदा करावा असा विचार करतो. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नही करतो. परिपक्व होण्याचे त्याचे प्रयत्न पाहून जेनीही खुश होते. आता जेनी त्याच्या प्रेमात पार बुडून जाते. त्यात ती समोर दिसत असलेल्या सत्याकडेही पाठ फिरवते. पण हे सत्य काय असते? त्यासाठी 'अजब प्रेम की गजब कहानी' पहायला हवा.