1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट

अजय बनणार ‘अशोका: द ग्रेट’

अजय
PRPR
राजकुमार संतोषी एक प्रतिभाशाली दिग्दर्शक असून त्यांनी आतापर्यंत किती चित्रपटाची घोषणा केली असेल याची त्यांनाही आठवण नसेल. अनेक दिवसांपासून तयार असलेला 'हल्लाबोल' अजूनही प्रदर्शित झाला नाही. आता तो 21 डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे समजते.

एका चित्रपटावर काम करत असताना त्यादरम्यान अनेक चित्रपटांवर काम करण्याची सवय त्यांना आहे. ते पीव्हिआरसाठीही चित्रपट तयार करणार आहेत. अजय देवगण व काजोल घेऊन 'रामायण' नावाचा चित्रपट तयार करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

तसेच पृथ्वीराज व संयुक्तावर आधारीत चित्रपट तयार करण्याचा विचारही त्यांच्या मनात अनेक वेळा आला. परंतू आता ते अजय देवगणला घेऊन सम्राट अशोकाच्या जिवनावर आधारीत 'अशोका: द ग्रेट ' हा चित्रपट तयार करणार असून लवकरच हा चित्रपट पूर्ण केला जाईल असे सांगितले जाते.

2001 मध्ये शाहरुख खानच्या रूपात ‘अशोका’ चित्रपटात सम्राट अशोकाचे रूप प्रेक्षकांनी पाहिले आहे. मात्र तो प्रेक्षकांना न आवडल्यामुळे बॉक्स ऑफीसवर फ्लॉप झाला. याचा काहीही परिणाम राजकुमार संतोषीवर झालेला नाही. ऊलट त्यानुसारच चित्रपट तयार करणार आहेत.


शाहरुख खानच्या चित्रपटाचा शेवट जिथे झाला तेथून नवीन चित्रपटाची सुरवात करणार आहेत. त्यामध्ये कलिंगा युद्धाला महत्त्व दिले जाणार असून या युद्धामुळे अशोकाच्या जीवनावर किती मोठा परिणाम झाला होता. हे दर्शकांसमोर मांडण्याचा प्रयत्न संतोषी करणार आहेत.

चित्रपटाची शूटिंग जानेवारी 2008 मध्ये सुरू होणार असून त्यासाठी थायलंड व मलेशियातील जंगलाची निवड केली आहे. बिपाशा बासू या चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे.

संतोषीचे सनी देओलबरोबर न पटल्यामुळे त्यांनी अजय देवगणला घेऊन नवीन टीम तयार केली आहे. त्या दोघांनीही ‘लज्जा’, ‘खाकी’, ‘द लिजंड ऑफ भगतसिंग’ आणि ‘हल्ला बोल’ या चित्रपटात बरोबरच काम केले आहे. परंतू सनी देओलने केलेले चित्रपट यशस्वी झाल्याचा इतिहास आहे. मात्र अजय देवगणबरोबर त्यांना आपले खाते उघडावे लागणार आहे.

सध्या ते अशोकाबाबत संशोधन करत असून लवकरच हा चित्रपट पूर्ण होईल अशी अपेक्षा करू!!
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा