अब्बास मस्तान जोडीचा नकाब
|
निर्माता : कुमार एस तौरानी, रमेश एस तौरानी
दिग्दर्शक : अब्बास मस्तान
संगीत : प्रीतम चक्रवती
कलाकार : बॉबी देवल, अक्षय खन्ना, उर्वशी शर्मा
रहस्यमय चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेली दिग्दर्शक द्वयी अब्बास मस्तान आता 'नकाब' चित्रपट घेऊन येत आहे. याअगोदर त्यांनी अक्षय व बॉबी देवल यांची भूमिका असलेला 'हमराज' चित्रपट दिग्दर्शित केला होता. तो चांगलाच गाजला. रहस्याभोवती गुंफलेली कथा, वेगवान हाताळणी आणि त्याला हीट गाण्यांची फोडणी हा या द्वयीचा फॉर्म्युला आतापर्यंत यशस्वी ठरला आहे. त्यामुळे कलाकार त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असतात.
'नकाब' चित्रपटाचे कथानक सोफी (उर्वशी शर्मा), करण खन्ना (बॉबी देवल) व विकी मल्होत्रा (अक्षय खन्ना) या तीन पात्रांभोवती गुंफण्यात आले आहे. या पात्रांची स्वप्न, इच्छा, आकांक्षा भिन्न आहेत. आर्थिक, सामाजिक पार्श्वभूमीसोबतच आव्हानेही भिन्न आहेत. सोफी मध्यमवर्गीय मुलगी, तर करण खन्ना गर्भश्रीमंत.
|
|

