1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट

अर्जुनला ''जन्नत'' मिळेल?

अर्जुनला 'जन्नत' मिळेल?
समय ताम्रक

निर्माता : मुकेश भट
दिग्दर्शक : कुणाला देशमुख
संगीत : प्रीतम चक्रवर्ती व कामरान अहम
कलाकार : इमरान हाशमी, सोनल चौहान, समीर कोचर, जावेद शेख (पाकिस्तान), विशाल मल्होत्र
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख : 16 मे.

जन्नत चित्रपटात निर्मात्यांनी झटपट श्रीमंत होणार्‍या एका अर्जुन नावाच्या तरुणाची कहाणी सांगितली आहे. अर्जुन हा अत्यंत बेजबाबदार तरुण असतो.त्याला फक्त झटपट पैसे कमावायचे असतात. तो यासाठी चुकीचा मार्ग निवडतो.

तो जुगार खेळायला लागतो. एकदा तो एका मॉलमध्ये जोया नावाच्या एका मुलीशी होते. तो तीच्या प्रेमात पडतो. तिला पटवण्यासाठी तो वाटेल ते करायला तयार होतो.

पैसे कमावून तिला इम्प्रेस करण्याच्या नादात तो माफिया बनतो. तो क्रिकेट सट्टेबाज बनतो आणि अल्पावधीतच चिक्कार पैसे कमावतो.

यानंतर चित्रपटात एक प्रसंग असा येतो, की त्याला पैसा, किंवा जोया यांच्या पैकी एकाची निवड करायची असते.

तो यातून कोणाची निवड करतो?
पैसा आणि जोया या पैकी तो कोणाला निवडतो?
या प्रश्नांचे उत्तर हवे असेल तर पाहा जन्नत.
About Writer
वार्ता