1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

आई हेट लव्ह स्टोरीज

आई हेट लव्ह स्टोरीज
निर्माता : हीरू यश जोहर, करण जोहर, रॉनी स्क्रूवाला
लेखक-दिग्दर्शक : पुनीत मल्होत्रा
संगीत : विशाल-शेखर
कलाकार : इमरान खान, सोनम कपूर, समीर दत्तानी, समीर सोनी, केतकी दवे, अंजू महेंद्रू, ब्रूना अब्दुल्ल

PR
‘आई हेट लव्ह स्टोरीज’चे टार्गेट आडियंस आहे, टीनएजर्स आणि जे लोकं आपला फारसा वेळ नेट सर्फिंगमध्ये घालवतात. म्हणून या चित्रपटाचा फर्स्ट लुक ट्विटरवर दाखवण्यात आला आहे. इमरान खान जेथे मुलींमध्ये हॉट मानला जातो तसेच मुलांना सोनमला पाहून कुछ कुछ होता है. सोनम-इमरानची फ्रेश जोडी या चित्रपटाचे वैशिष्टय आहे. चित्रपटाची पब्लिसिटी प्लॅनिंगबरोबर करण्यात येत आहे. सुरुवातीत रोज एक पोस्टर रिलीज करण्यात आले ज्याने दर्शकांची उत्सुकता या चित्रपटाबद्दल वाढू लागली.

PR
जय (इमरान खान) लव्ह, प्रेम, मोहब्बत सारख्या शब्दांपासून दूर पळत असतो. त्याला लव्ह स्टोरीज अजिबात आवडत नाही व प्रेम या शब्दावर त्याला विश्वास नसतो. तो वीर नावाच्या चित्रपट दिग्दर्शकाचा असिस्टेंट आहे. जयचे दुर्भाग्यच म्हणायला पाहिजे, कारण वीर इंडियन फिल्म इंडस्ट्रीचा सर्वात फेमस रोमांटिक फिल्म मेकर आहे. नेहमी प्रेमकथेवर आधारीत चित्रपट तयार करतो. आवडत नसल्यास तरी रोज जय त्या गोष्टींमध्येच असतो. गोष्ट तेव्हा बिघडते जेव्हा तो एका नवीन प्रोडक्शन डिझायनर सिमरन (सोनम कपूर) सोबत काम करतो. दोघांची प्रथम भेटच धूम धडाक्याने होते.

PR
जयच्या विपरीत सिमरनला लव्ह स्टोरीज फारच आवडतात. फ्लॉवर्स, चॉकलेट्स, गिफ्ट्स, प्रेम गीतं, प्रेमात नो सॉरी नो थँक्यू सारख्या गोष्टी तिच्या डोक्यात नेहमी फिरत असतात. तिच्या जीवनात एक चांगला बॉयफ्रेंड व आवडता जॉब असल्यामुळे ती फार खूश असते. जय आणि सिमरन एका लव्ह स्टोरीवर एकत्र काम करीत असतात आणि विचारांमध्ये मतभेद असल्यामुळे त्यांचे नेहमीच वाद विवाद होतात. जय आणि सिमरन आपली लव्ह स्टोरी शोधून काढतील? हे जाणण्यासाठी तुम्हाला चित्रपट ‘आई हेट लव स्टोरीज’ बघणे गरजेचे आहे.