1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट

आगामी चित्रपट : बॉडीगार्ड

बॅनर : रील लाइफ प्रॉडक्शन प्रा.लि., रिलायंस एंटरटेनमें
निर्माता : अतुल ‍अग्निहोत्री, अलविरा अग्निहोत्री
दिग्दर्शक : सिद्दीकी
संगीत : प्रीतम, हिमेश रेशमिया
कलाकार : सलमान खान, करीना कपूर, राज बब्बर, आदित्य पंचोली, कतरीना कैफ (पाहुणी कलाकार)

PR

जेव्हा प्रश्न वेळेचा कामाच्या प्रती निष्ठेचा येतो तेव्हा लवली सिंगचा सिंगशी कोणी प्रतिस्पर्धा करू शकत नाही. तो फारच मन लावून काम करतो आणि त्याच्या कामाचे 100 टक्के तो देतो. लवली सिंगवर फार मोठे उद्योगपती राणाच्या मुलीच्या अंगरक्षकाचे काम सोपवण्यात येते.


PR

वातीच्या सावलीप्रमाणे लवली सिंग दिव्याच्या पाठीशी असतो. त्याच्या ओव्हर प्रोटेक्टिव स्वभावामुळे दिव्या परेशान होते. कॉलेजमध्ये आपल्या इच्छेनुसार वागणारी दिव्याला लवली सिंगचे तिच्या पाठीशी राहणे बिलकुल पसंत पडत नाही.


PR

लवलीला आपल्या रस्त्यातून बाहेर काढण्यासाठी दिव्या एक मास्टर प्लॅन बनवते त्यात नकली प्रेमाचे जाळे लवली समोर टाकल्याने तो त्या जाळ्यात अडकले आणि दिव्या आपल्या आवडीप्रमाणे आपले जीवन जगेल. लवली सिंग फार टफ आहे आणि त्याला पटवणे सोपे नाही आहे, पण दिव्या या कामात यशस्वी ठरते.


PR

त्यानंतर लवली सिंह एकदम बदलून जातो, पण परिस्थिती एकदम विपरीत होते. दिव्याला लवलीबद्दल असे काही कळते ज्याची ती कल्पना देखील करू शकत नाही. ती फार मोठ्या धर्मसंकटात पडते आणि निर्णय घेण्यास असमर्थ ठरते.


PR

दिग्दर्शकाबद्दल : मल्ल्याळम आणि तमिळ सिनेमात सिद्दीकीचे फार नाव आहे. बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये ते कथाकार, पटकथा लेखक आणि दिग्दर्शकाच्या रूपात जुडलेले आहे. हिंदी चित्रपट हेराफेरी, हलचल, भागमभाग आणि ढोलं त्यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित आहे. करियरच्या सुरुवातीला त्यांनी लाल नावाच्या व्यक्तीसोबत मिळून चित्रपट निर्देशनाचे काम सुरू केले होते, पण नंतर ते वेगळे झाले. बॉडीगार्ड चित्रपट सर्वात आधी त्यांनी मल्ल्याळमामध्ये तयार केले होते, नंतर तमिळमध्ये. आता त्यांनी याला हिंदी आणि तेलगूमध्ये तयार केले आहे. सिद्दीकी म्हणतात की सलमान खानच्या चेहऱ्यावरच्या भोळसटपणाबघून त्यांनी हिंदीत बॉडीगार्ड चित्रपट तयार केले आहे.

About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा