1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट

आयशा: चित्रपट नवीन , संगीत जुने

बॅनर : अनिल कपूर फिल्म्स कंपनी, पीवीआर पिक्चर्स
निर्माता : अनिल कपूर, अजय बिजली, संजय बिजली, रिया कपूर
दिग्दर्शक : राजश्री ओझा
गीत : जावेद अख्तर
संगीत : अमित त्रिवेदी
कलाकार : अभय देओल, सोनम कपूर, सायरस साहूकर, अरुणोदय सिंह, इरा दुबे, अमृता पुरी, लिसा हेडन, युरी सूरी, एम.के. रैना

सोनम कपूरला बॉलीवुडमध्ये स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने अनिल कपूर यांनी आयशाची निर्मिती करण्‍याचा निर्णय घेतला होता. परंतु यापूर्वीच सोनमचा ‘आय हेट लव्ह स्टोरीज’ हा चित्रपट हिट ठरला. याचा फायदा तिला आपल्या आयशा या चित्रपटाच्या माध्यमातून मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जॅन ऑस्टिन याची कादंबरी असलेल्या ‘एमा’ यावर हा चित्रपट आधारीत आहे. यात आयशा (सोनम) ची महत्त्वाची भूमिका आहे. दिल्लीत रहाणारी आयशा सतत स्वत:च्या वेगळ्या विश्‍वात जगत असते. तिची एक मैत्रीण आहे. पिंकी बोस ( इरा दुबे) शैफाली ठाकुर (अमृता पूरी) ही आणखी एक मैत्रीणरणधीर गंभीर (सायरस) व ध्रुव सिंह (अरुणोदर सिंह) या सार्‍यांच्या कामात लुडबूड करण्‍याचा अधिकार आपल्याला आहे असा तिचा समज असतो.

अर्जुन बर्मन (अभय देवोल) स्पष्ट वक्ता व अत्यंत बुद्धीमान व्यक्ती आहे. तो मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखला जातो. न्यूयॉर्क , लंडन, सेन फ्रान्सिंस्को व दिल्लीत तो सतत फिरत असतो. व्यवसायाने तो इन्वहेस्टमेंट बँकर आहे. त्याला आयशा आवडत असते. त्याला आयशात बदल घडवून आणायचा असतो व आयशाला त्याच्यात, कोण जिंकतो हे चित्रपटातच कळेल.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा