सोमवार, 2 फेब्रुवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

एक : द पॉवर ऑफ वन

एक द पॉवर ऑफ वन
IFM
बॅनर - के. सेरा सेरा
दिग्दर्शक - संगीत सिवन
संगीत - प्रीतम
कलाकार - बॉबी देओल, श्रेया सरन, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, जरीना वहाब

'एक : द पॉवर ऑफ वन' ही एका अनाथ मुलाची प्रेमकथा आहे. अनाथ नंदू (बॉबी देओल)वर एका राजकारण्याच्या खुनाचा आळ येतो. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी तो एका रेल्वेमध्ये बसतो. याठिकाणी त्याची शेखर (प्रदीप खरब)शी भेट होते.

शेखर आणि नंदू यांची मैत्री होते. शेखर आपल्या भावाच्या लग्नासाठी चाललो विशेष म्हणजे चौदा वर्षांनंतर आपल्या घरी जात असून आजोबांची सेवा करणार असल्याचे तो नंदूला सांगतो.

दरम्यान, नंदूचा पाठलाग करणारे पोलिस रेल्वेत येतात. नंदूला पाहून पोलिस त्याच्यावर गोळ्या झाडतात पण, शेखर मध्ये पडतो आणि त्याला गोळ्या लागतात.
शेखरचा मृत्यू झाल्याने त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी नंदू त्याच्या आजोबांकडे जातो. पण, त्याच्या घरातील लोक नंदूलाच शेखर समजतात. त्याठिकाणी त्याची प्रीत (श्रेया सरन)शी भेट होते आणि दोघे एकमेकांजवळ येतात.

नंदूचा पाठलाग करत सीबीआय अधिकारी राणा (नाना पाटेकर) त्याठिकाणी पोहोचतात. येथून पुढे काय होते. नंदूला पोलिस पकडतात? त्याची सुटका होते? त्याचे प्रीतशी लग्न होते? हे जाणून घेण्यासाठी पाहा एक : द पॉवर ऑफ वन...