शुक्रवार, 30 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

एक्शन रिप्ले

एक्शन रिप्ले
निर्माता-दिग्दर्शक: विपुल शाह
संगीत: प्रितम कुमार कलाकार: अक्षय कुमार, ऐश्वर्या रॉय नेहा धुपिया, किरण खेर, ओम पुरी, आदित्य राय कपूर
रिलीज डेट: 5 नोव्हेंबर 2010

1965 ची घटना असेल किशन (अक्षय कुमार) वडील सुर्यप्रकाश भोजनालयावर काम करत असतो. 2010 मध्ये तो एका प्रसिद्ध बॉलीवुड कॅफेचा मालक आहे. परंतु अजुनही मेहनत करण्‍याची त्यांची सवय त्यांने सोडलेली नाही. स्वस्तात भाजी मिळेल म्हणून तो तासं-तास बाजारात फिरत असतो.

कॅफे त्याची पत्नी माला (ऐश्वर्या रॉय) सांभाळते.मालाचा स्वभाव अत्यंत रागिट आहे. हसण्यापासून ते बोलण्यापर्यंत तिचे बोलणे जोर्‍याचेच असते. एका टॉमबॉयप्रमाणे ती रहात असते. तिच्या मैत्रिणी कमी व मित्रच जास्त आहेत.

पैसे खर्च करण्‍याची तिला सवय आहे. जर तिच्या कारचा एखादा पार्ट खराब झाला, तर ती कारच नवीन घेऊन येईल.

माला व किशनचे लग्न होऊन बरेच वर्ष उलटले असले तरी त्यांच्यात अजुनही भांडणेच होत रहातात. त्यांचा मुलगा बंटी (आदित्य रॉय कपूर) त्यांच्या भांडणाला कंटाळला आहे.

WD
बंटीची गर्ल फ्रेंड तान्या (सुदीपा सिंह) ला त्याच्याशी लग्न करण्‍याची इच्छा आहे. पण आपल्या आई-वडीलांचे भांडण पाहिल्यानंतर बंटीने लग्न न करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

बंटीला तान्याचे अजोबा सांगतात, एकतर तान्याशी लग्न कर अन्यथा तिचा नाद सोडून दे. बंटी आई-वडीलांच्या 35 मॅरेज एनीर्व्हसरीला एक पार्टी ठेवतो. या पार्टीतही किशन व मालात जोरतार भांडण होते.

बंटी या दोघांना टाईम मशीनने मागे नेत त्यांचे एरेंज मॅरेज लव्ह मॅरेजमध्ये बदलण्‍याचा प्रयत्न करतो. अशी सारी कथा आहे ‘एक्शन रिप्ले’