1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
  6. काई पो चे चित्रपटाचे कथानक

Kai po Che: Movie Preview | काई पो चे चित्रपटाचे कथानक

PR
PR
बॅनर : यूटीवी स्पॉट बॉय
निर्माता : रॉनी स्क्रूवाला, सिद्धार्थ रॉय कपूर
दिग्दर्शक : अभिषेक कपूर
संगीत : अमित त्रिवेदी
कलाकार : सुशांत सिंह राजपूत, अमित साद, राजकुमार यादव, अमृता पुरी
प्रदर्शन तारिख : २२ फेब्रुवारी २०१

'काई पो चे!' एक हिंदी चित्रपट आहे, मात्र नांव गुजराती आहे. चित्रपटाचे कथानक गुजरातच्या पार्श्वभूमीवर बेतलेले असल्याने नांवही गुजराती ठेवण्यात आले. दुसर्‍याची पतंग काटल्यावर जसा हुर्रे..... करतो, त्याचप्रमाणे गुजरातीत काई पो चे! म्हणून हुर्रे केल्या जातो.

चित्रपट चेतन भगत यांच्या 'द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ' या कादंबरीवर बेतण्यात आला आहे. अभिषेक कपूर यांनी दिग्दर्शन केले असून याअगोदर त्यांच्या 'रॉक ऑन' चित्रपटाने समीक्षकांनी वाहवा लुटली होती.

PR
PR


अहमदाबाद येथे ईशान, गोविंद व ओमी नावांचे तिघे मित्र राहतात. सर्व युवकांप्रमाणे यांचीही काही स्वप्ने आहेत. गोविंदला व्यवसाय सुरू करायचा आहे. ईशान व ओमी यांचे क्रिकेट प्रेम बघून तो खेळसाहित्याचे दुकान सुरू करतानाच क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात करतो. तिघेही एकत्र आहेत मात्र त्यांची ध्येय वेगवेगळी आहेत.

गोविंद यांस व्यवसायातून पैसे कमवायचे आहेत. ईशान युवकांना क्रिकेटचे धडे देत असताना अली नावांचा दमदार हिरा त्यास गवसतो. त्या हिर्‍यास पैलू पाडण्याचा ध्यास तो घेतो. ओमी यांस या दोघा मित्रांची कंपनी आवडते म्हणून तो सोबत असतो.
PR
PR


याचदरम्यान शहरात सामाजिक व राजकीय उलथापालथ घडून येते आणि त्यांचे व्यक्तिगत आयुष्याची कसोटी घेणार्‍या घटना घडतात. बदलत्या आव्हानात्मक सामाजिक परिस्थितीत त्यांच्या मैत्रीचे रोपटे तगेल काय, बदलांच्या त्यांच्यावर काय परिणाम होतो, ते त्यास कसे सामोरे जातात, या प्रश्नांची उत्तरे चित्रपटात मिळेल.

१३ फेब्रुवारी २०१३ रोजी बर्लिन चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले आणि १६०० आसन क्षमतेच्या चित्रपटगृह एक दिवस अगोदरच संपूर्ण बुक झाले. यामुळे चित्रपट निर्मात्यांचा उत्साह चांगलाच दुणावला आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा