बुधवार, 28 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

काश मेरे होते

काश मेरे होते
IFM
निर्माता - श्रवण फिल्म इंटरनॅशनल
दिग्दर्शक - बी.एच. तरूण कुमार
गीतकार - समीर
संगीतकार - संजीव दर्शन
कलाकार - कुमार साहिल, स्नेहा उल्लाल, सना खान, राजेश खन्ना, जॉनी लीवर

‘काश मेरे होते’ हा एक म्युझिकल थ्रिलर चित्रपट आहे. टीनएजचे एकमेकांविषयाचे आकर्षण आणि एकतर्फी प्रेम दाखविण्यात आले आहे. फॅशन फोटोग्राफर कृष कपूर (कुमार ‍साहिल) ची कथा आहे. राधिका (स्नेहा उल्लाल) या आपल्या पत्नीबरोबर तो सुखी आहे. राधिका एक डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये काम करत असते.

IFM
कृषला एका पत्रिकेसाठी फोटो शूट करण्याची संधी मिळते. यासाठी तो मॉरीशस मध्ये जातो. त्यांठिकाणी काही दिवस रहावे लागणार असल्याने तो कर्नल बत्रा (राजेश खन्ना) यांचा बंगला भाड्याने घेतो.

कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी पिया (सना खान) कृषला बघताक्षणीच त्याच्या प्रेमात पडते. कृषचे लक्ष वेधून घेणासाठी ते प्रयत्न करते. कॉलेजमध्ये आपल्या मित्रांना आपली आणि कृषची प्रेमकहाणी सांगते.

आपण विवाहीत असल्याचे सांगून कृष तिला नकार देतो तरीही ती त्याची पाठ सोडत नाही. कृष आणि आपल्या मध्ये येणा-या प्रत्येकाला ठार मारायचे असे ती ठरविते.

IFM
अचानक शहरात अनेक खुन होतात. याचा तपास आई.जी. डांडा (जॉनी लीवर) यांच्याकडे असतो. इकडे कृषला मिळवण्यासाठी पिया जादूटोण्याचा आधार घेते. पिया आपला उद्देश यशस्व करते? याचे उत्तर चित्रपट पाहून मिळवण्यातच मजा आहे.