1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट

किससे प्यार करू?

IFM
बॅनर - के सेरा सेरा
दिग्दर्शक - अजय चंडोक
संगीत - डब्बू मलिक
कलाकार - अरशद वारसी, उदिता गोस्वामी, आशिष चौधरी, आरती छाबरिया, श्वेता मेनन, आशिष विद्यार्थी

जॉन (आशिष चौधरी), सिद (अरशद वारसी) आणि अमित (यश टोक) हे एकमेकांचे जिगरी मित्र आहेत. कायम एकमेकांबरोबर राहणारे आणि जीवनाचा पुरेपूर आनंद लुटणा-या या मित्रांच्या जीवनात शीतल (उदिता गोस्वामी) येते आणि वेगळेच वळण येते.

जॉनच्या संपत्तीवर नजर असणार शीतल त्याच्याशी प्रेमाचे नाटक करते. नाकासमोरच चालणारा जॉन शीतलाच्या प्रेमात पडतो. पण, मित्रांची आडकाठी नको म्हणून त्यांच्या मैत्रीमध्ये फूट पाडते.

सिद आणि अमितला शीतलची खेळी लक्षात येते जॉनला वाचविण्यासाठी ते 'सेव्ह जॉन ऑपरेशन' नावाची योजना आखतात. त्यांची योजना फसविण्याचा प्रयत्न शीतल करते.

जॉनला शीतलच्या कचाट्यातून वाचविण्यात मित्रांना यश मिळते? का शीतलची खेळीच यशस्वी ठरते? हे जाणून घेण्यासाठी पाहा.. किससे प्यार करू?
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा