कॉलेजमध्ये राज मल्होत्रा (शाहीद कपूर) प्रत्येक बाबतीत आघाडीवर आहे. अभ्यास असो, खेळ असो की कॉलेजचे एन्युअल फक्शन प्रत्येक बाबतीत राज आघाडीवर असतो.
आर्किटेक्टचा चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजच्या हातात 'बेस्ट स्टुडंट'चा पुरस्कार घेऊनच बाहेर पडला. मात्र बाहेरच्या जगात अव्वल स्थानी राहणे सोपी गोष्ट नाही. आपल्या क्रमांक 1 वर असण्याच्या आकांक्षेसाठी राजला बाह्य जगात प्रचंड खूप संघर्ष करावा लागतो.
IFM
अश्या संघर्षाच्याच काळात राजच्या नशिबाने त्याच्यावर पाठ फिरविली. जेव्हा-जेव्हा काही चांगलं होईलसं वाटत तेव्हा नेमकं त्याच्या नशिबानं त्याला दगा द्यायला सुरुवात केलेली. महत्त्वाच्या कामासाठी सकाळी लवकर उठू म्हणून अलार्म लावलेला तर तो नेमका वाजत नाही. अंघोळीच्या वेळी मध्येच अचानक पाणी गायब. कधी कार रस्त्यातच धोका देणार, कधी एखादी महत्त्वाची डील रद़द तर कधी डील करणाराच हे नश्वर जग सोडून जाणार. अशा चक्रव्यूहात पुरत्या अडकलेल्या राजची 'किस्मत'त्याच्यापासून दूर गेलेली.
नशिबाच्या फे-यात अडकलेला राज शेवटी क्रिस्टल बॉल रीडर हसीना बानो जानकडे (जूही चावला) काहीतरी मार्ग शोधण्यासाठी जातो. ती त्याला सांगते, की त्याचे नशीब लवकरच बदलेल मात्र नशीब बदलण्यासाठी त्याला लकी चार्म शोधावा लागेल. आता हा लकी चार्म शोधणार कुठे हे मात्र हसीना त्याला सांगत नाही. शोध सुरू होतो...
अचानक राजच्या आयुष्यात टर्निंग पॉंईंट येतो आणि त्याला आता सर्वकाही व्यवस्थित होऊ लागल्याची जाणीव होते. अव्वल क्रमांकाचा बिल्डर संजीव गिल (ओम पुरी) राजवर इम्प्रेस होऊन त्याला एक महत्त्वाच्या प्रोजेक्टची जबाबदारी सोपवितो.
आता वळूया प्रियाकडे (विद्या बालन). प्रिया वरवर कठोर दिसत असली तरीही मनातून खूप चांगली आहे. जग अधिकाधिक चांगले बनविण्यासाठी तिची काही तत्त्व आहेत. या दिशेने ती एकटीच लढतेय. चांगले आणि वाईट याशिवाय जगात दुसरे काहीही नाही अशी तिची पक्की धारणा.
IFM
प्रियाला इम्प्रेस करण्यातही राज यशस्वी होतो. तिच्या कम्युनिटी सेंटरला पाडण्यापासून वाचविण्यात तो तिची मदत करतो आणि तिच्यासाठी जणू देवदूतच ठरतो.
राजला अनवधानेच त्याचा लकी चार्म मिळतो की काय? त्याचे नशीब फळफळते का? आयुष्यातील हा बदल त्याला कुठल्या वळणावर घेऊन जाईल? प्रेमाच्या प्रदेशात की यशस्वितेच्या शिखरावर? या प्रश्नांची उत्तरे केवळ ‘किस्मत कनेक्शन पाहूनच मिळतील.