गुरूवार, 1 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

कुर्बान

कुर्बान सैफ अली खान
IFM
IFM
फिल्म : कुर्बान
दिग्दर्शक : रेंसिल डीसिल्वा
संगीत : सलीम सुलैमान
कलाकार : सैफ अली खान, करीना कपूर, विवेक ओबेराय, दीया मिर्जा, ओम पुरी, किरण खेर.

कुर्बान सध्या सैफ अली खान आणि करीना कपूर या युगलाने दिलेल्या 'हॉट'दृश्यांमुळे चर्चेत आहे. ही 'हॉट' दृश्ये चित्रपटाचा एक भाग आहेत. मुख्य कथा मात्र दहशतवादाभोवती फिरते. प्रा. अवंतिका (करीना कपूर) न्यूयॉर्कमध्ये रहाते आहे. आजारी वडिलांना पहाण्यासाठी आलेली अवंतिका भारतात येते. इथे ती तात्पुरती प्राध्यपकाची नोकरी करते. तिथे तिला एहसान (सैफ अली खान) भेटतो. तिथे दोघांत प्रेम होते आणि अवंतिकाची इच्छा पाहून तिचे वडिल या लग्नाला मान्यता देतात.

IFM
IFM
लग्नानंतर ते दोघे अमेरिकेला जातात. तिथे गेल्यानंतर सैफला ती नोकरीला लावून देते. त्यांच्या शेजारी कट्टर मुस्लिम कुटुंब रहात असते. अवंतिकाला ते आवडत नाही. शिवाय एहसानच्या काही हालचालीही तिला संशयास्पद वाटू लागतात. त्याचवेळी तिला सलमान नावाची युवती भेटते. ती तिला एहसानविषयी बरेच काही सांगते. त्याने ती पार हादरून जाते. सलमा काय सांगते हे पहाण्यासाठी कुर्बान पहायला पाहिजे.