1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट

कॉमेडीचा डोसः बुढ्ढा मर गया

निर्माता: राहुल रवैल - सुनील लुल्ला
दिग्दर्शक: राहुल रवैल
संगीतकार: बप्पी लहरी
कलाकार: परेश रावल, अनुपम खेर, ओम पुरी, राखी सावंत, रणवीर शौरी, मुकेश तिवारी

IFMIFM
मोह मनुष्यास अधिक लोभी बनवतो. पैशांमागे धावणार्‍या मनुष्याच्या लोभीपणास अंत नसतो. करोडो रूपये संपत्ती असलेल्या व्यक्तीलाही पैशाचा मोह आवरत नाही. 'बुढ्ढा मर गया' या चित्रपटाचा विषय हाच आहे. दिग्दर्शक राहूल रवेल यांनी विडंबन व विनोदी शैलीची ही भन्नाट गुंफण प्रेक्षकासमोर मनोरंजकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
लक्ष्मीकांत कबाडिया हे भारतातील गर्भश्रीमंतापैकी एक. लोक त्यांना एल. के. या टोपणनावानेच ओळखतात. भंगाराच्या व्यवसायापासून सुरूवात करत त्यांनी स्वकर्तृत्वावर समाजात प्रतिष्ठा आणि पैसा कमावला आहे. ते आता आपल्या कंपनीसाठी बाजारातून पाच कोटी रूपये जमा करणार आहेत. स्वत:चा आयपीओ आणणार आहेत.
IFMIFM
एल. कें च्या कुटुंबात रणजीत आणि समीर अशी दोन मुले, एक अविवाहित बहिण, श्रुती आणि अंजू नावाच्या दोन सुना. संजना आणि नम्रता या रणजीतच्या दोन मुली तर पवनचा मुलगा समीर असे सदस्य आहेत. या सर्वांचा डोळा एल. कें च्या संपत्तीवर असतो. आयपीओ उघडण्याच्या आदल्या रात्रीच एल. के यांचा अचानक मृत्यू होतो. कुटुंबातील सर्वजण घाबरून जातात. त्यांना दुःख एल. के यांच्या मृत्यूचे नसते. एलके गेल्यामुळे त्यांच्या समभागात गुंतवणूक करणार कोण याचे असते.
अशावेळी विद्युत बाबा नावाचा एक भोंदू साधू त्यांना एक युक्ती सांगतो. एल केच्या मृत्यूची बातमी घराच्या बाहेर कुणालाही सांगू नका. लोकांनी समभाग विकत घेतल्यावर दोन दिवसांनी सांगा, असा सल्ला तो देतो. विद्युत बाबाने सांगितलेली युक्ती सर्वांना पटते. एवढ्या मोठ्या प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्तीच्या मृत्यूची बातमी लपवून ठेवणे अवघड गोष्ट. पण हे सर्व त्यात यशस्वी होतात. नंतर जेव्हा एल. के च्या मृत्यूबद्दल सर्वांना सांगण्याची वेळ येते त्यावेळी परिस्थिती अशी काही बनते की त्यांना आणखी काही दिवस आपले तोंड बंद ठेवावे लागते. नंतर ते एल. के च्या एका खोट्या मित्राच्या मृत्यूची घोषणा करतात आणि त्या बहाण्याने एल. के यांच्यावर अंत्यसंस्कार करतात.
नंचर काही शोध पत्रकारांना एलकेंच्या मृत्यूबाबतचे सत्य कळते. ते घरातील फितूर नोकराच्या माध्यमातून आणखी माहिती मिळवतात. मृतदेहाची विल्हेवाट लावणार्‍यांचा शोध घेतात. या प्रकरणामुळे कुटुंबात भांडणेही होऊ लागतात. या सर्व प्रकारच्या खटाटोपाला दिग्दर्शक राहूल रवैल यांनी कसे मांडले आहे ते 'बुढ्ढा मर गया' बघितल्यावरच समजेल.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा