मंगळवार, 6 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

'खलबली' अनलिमिटेड हसा

खलबली  अनलिमिटेड हसा
IFM
निर्माता - आजम खान
दिग्दर्शक - अजय चंडोक
संगीतकार - साजिद-वाजिद
कलाकार - निखिल द्विवेदी, चंकी पांडे, राजपाल यादव, सुरेश मेनन, असरानी, जॉनी लीवर, शक्ति कपूर

हास्य कलाकारांचा गोतावळा जमा करून पोटधरून हसायला लावणारा चित्रपटाची निर्मिती आजम खान यांनी केली आहे. चित्रपटाचे नाव ‘खलबली’ आहे आणि यामध्ये अनलिमिटेड 'फन' असल्याचे म्हटले जात आहे.

एका श्रीमंत हॉटेलमालकाची ही कथा आहे. त्याची दुस-या हॉटेलशी स्पर्धा सुरू असते. त्याला धडा शिकवण्यासाठी तो गुंडांच्या टोळीची मदत घेतो. ते गुंड त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या हॉटेलमध्ये बॉम्ब लावतात.

विविध देशातून आलेले अनेक लोक हॉटेलमध्ये उतरलेले असतात. कोणी प्रेमी आहेत तर कोणी राजकीय नेते. कोणी चित्रपट निर्माते आहेत तर कोणी अंडरवर्ल्ड डॉन. हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याची बातमी कळताच एक‍च 'खलबली' सुरू होते ती कशी यासाठी पहा ‘खलबली - फन अनलिमिटेड’