निर्माता - शुबीर एस. मुखर्जी दिग्दर्शक - नीरज पाठक संगीत - नदीम-श्रवण कलाकार - डीनो मोरियो, महिमा चौधरी, सुमन रंगनाथन, गोविंद नामदेव
रिया (महिमा चौधरी) एक मॉडेल आहे आणि तिला चित्रपटात करीयर करायचे असते. ती म्यूझिक व्हिडियो मध्ये काम करत असते. एक दिवस शूटिंगवेळी स्टंटमॅन देव (डीनो मोरिया) तिचा जीव वाचवतो. त्यांच्या मैत्री होते आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते.
IFM
ऋषि (मदन) हा कास्टिंग डॉयरेक्टर आहे आणि त्याला आपल्या चित्रपटासाठी नायिकेचा शोध असतो. रियाची त्याची भेट होते आणि तो तिला ऑफर देतो. शिमल्यात जाऊन दिग्दर्शक मुनी (गोविंद नामदेव) यांची भेट घेण्यास तो सांगतो.
पर, रिया काहीच निर्णय घेऊ शकत नाही. देव तिचा उत्साह वाढवतो. देवच्या सांगण्यानुसार ती दुस-याच दिवशी शिमलात जाते. रियाचे सौदर्य पाहून मुनी प्रभावित होतो आणि आपल्या चित्रपटात तिला नायिका म्हणून घेतो.
रियाबरोबर सहस्यमय घटना घडतात. दुस-याच दिवशी तिची स्क्रीन टेस्ट घेतली जाते आणी ती कॅसेट शिमलामध्ये रहाणा-या महिला रेमन (सुमन रंगनाथन) या श्रीमंत व्यक्तीला दिली जाते. मुनी आणि त्याच्या सहकर-यांचे वागणे शंकास्पद असते. रियाला जेव्हा हे कळते तेव्हा ती त्यांच्याशी दोन हात करते. पण़ ते कसे ते चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल.