मंगळवार, 6 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

गॉड तुस्सी ग्रेट हो

गॉड तुस्सी ग्रेट हो
WDWD

निर्माता : अफज़ल खान
दिग्दर्शक : रूमी जाफरी
संगीत : साजिद-वाजिद
कलाकार : सलमान खान, प्रियंका चोप्रा, अमिताभ बच्चन, सोहेल खान, अनुपम खेर

आणखी एक दिवस उदास गेल्याने अर्जुन प्रजापती (सलमान खान) परमेश्वरावर चिडतो. अर्जुनच्या मते त्यांच्या जीवनात दु:ख भरण्याचे काम परमेश्वरानेच केले आहे. परमेश्वर (अमिताभ बच्चन) मानवी रूपात येऊन त्याच्यासमोर उभा राहतो त्यावेळी अर्जुनला आश्चर्याचा सुखद धक्का बसतो. परमेश्वर त्याला स्वतःकडील काही विशेष शक्ती प्रदान करतो. मात्र वर एक अटही घालतो. अर्जुनने यापुढे परमेश्वराची कामे केली पाहिजेत. अर्जुन ही अट मान्य करतो. परमेश्वरापेक्षाही आपण त्याची जबाबदारी चांगली निभावू असा त्याला विश्वास असतो.
WDWD
त्याची प्रेयसी आलिया (प्रियंका चोप्रा) त्याला मिळालेल्या शक्तींनी आश्चर्यचकित होते. अर्जुनला वाटते की, तो संपूर्ण जगाला सुखी करेल. प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करेल. मात्र, घडते निराळेच. त्याच्या या निर्णयाने सर्वत्र हाहाकार माजतो. त्याचे सर्व निर्णय चुकीचे ठरतात. शेवटी अर्जुनला परमेश्वराला शरण जावेच लागते. परमेश्वराचे काम हे मानवाच्या बुद्धीच्या पलीकडचे आहे, याची जाणीव त्याला होते.