निर्माता : महेश पडाळकर दिग्दर्शक : उज्जवल सिंह कथा-पटकथा-संवाद : विजया रामचंद्रुला गीत : पियूष मिश्रा संगीत : इल्याराजा कलाकार : मिथुन चक्रवर्ती, रति अग्निहोत्री, मुकेश खन्ना, दर्शन जरीवाला, कंवलजीत, जया भट्टाचार्य
अडचणी आल्या तर लहानगी मोठ्यांकडे जातात, पण मोठ्यांनीच अडचणी निर्माण केल्या तर ती कुणाकडे जातील?
'चल चले' आई-वडिलांचा मुलांवर अनावश्यक दबाव, टोकाच्या अपेक्षा आणि यात मुलांचे भरडणे या विषयावर आधारीत आहे. मुलांनी भरपूर शिकावे, भरपूर मार्क्स मिळवावे, चांगली नोकरी मिळवावी असे आई-वडिलांना वाटते. यात गैर काही नाही. पण त्यासाठी टोकाचा आग्रह त्रासदायक ठरू शकतो. आपली अपूर्ण स्वप्ने मुलांच्या माध्यमातून पूर्ण करणे चुकीचे आहे. त्यामुळे अनेकदा दबावाखाली येऊन मुले जीव देण्यापर्यंतची अघोरी पावले उचलतात.
PR
'चले चले'मध्ये आठ मुला-मुलींचा ग्रुप आहे. यातील नवनीतचे वडिल (कंवलजीत) त्याला विज्ञान विषय घेऊन पुढे करीयर करायला सांगतात. पण विज्ञानात त्याला रूची नाही. पण वडिल ऐकत नाही आणि नवनीत आत्महत्या करतो.
नवनीतचे मित्र या घटनेने हादरतात आणि गंभीर होतात. मग ते संजय (मिथून चक्रवर्ती) या वकिलाची मदत घेतात. पालकांविरूद्ध आंदोलन उभारतात. मग या आंदोलनाचे फलित काय निघते हे पाहण्यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहिला पाहिजे.