शुक्रवार, 6 फेब्रुवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

चांदनी चौक टू चायना

चाँदनी चौक टू चाइना
IFM
निर्माता - रमेश सिप्पी, मुकेश तलरेजा, रोहन सिप्पी
दिग्दर्शक - निखिल आडवाणी
संगीत - शंकर-अहसान-लॉय
कलाकार - अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, रणवीर शौरी, मिथुन चक्रवर्ती, गॉर्डन लियू

तरूणांना 'इस्टंट' यश हवे असते. यासाठी ते नेहमीच शॉर्टकटच्या शोधात असतात. 'कष्ट करा' असा टिपीकल सल्ला घरातील वडिलधारी मंडळी नेहमी देतात. पण, कष्ट कोण करणार? दिल्लीच्या चांदनी चौकातला सिद्धूही असाच आहे. रस्त्याच्या कडेला असणा-या खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर भाजी चिरून वैतागलेला सिध्दू श्रीमंत होण्याची स्वप्ने पहात असतो. एका रात्रीत नशीब उजळावे यासाठी तो बाबा-बुवांचे सल्ले घेऊ लागतो.

IFM
कष्टाविना फळ नाही, असा सल्ला त्याचे वडिलांसमान दादा (मिथुन चक्रवर्ती) त्याला देतात. पण, सिध्दू या कानाने ऐकतो आणि त्या कानाने सोडून देतो. अखेर सिद्धू ज्या क्षणाची वाट पहात असतो तो क्षण येतो.

चीनहून दोन अनोळखी व्यक्ती सिद्धूकडे येतात. मागल्या जन्मात तू चीनमधील मोठा योध्दा होतास आणि तुझा पुनर्जन्म झाला आहे, असे सांगून त्याला चीनमध्ये येण्याची विनंती करतात. हे ऐकून सिद्धू हवेतच जातो. आता भाजी चिरण्यापासून कायमची सुटका होणार या विचाराने तो भलताच सुखावतो. महागडी दारू आणि सुंदर स्त्रिया भोवती फिरत असल्याची स्वप्ने त्याला पडू लागतात.

IFM
चिनी भाषा अवगत असणा-या चॉपस्टिकला (रणवीर शौरी) याची खबर मिळते. सिध्दूची फसगत होत असल्याचे लक्षात येऊनही चॉपस्टिक त्या दोघां चिन्यांचीच मदत करतो. खतरनाक स्मगलर होजो (गॉर्डन लियू) याच्या दहशतीपासून एका गावाची मुक्तता करण्‍यासाठी सिध्दूला घेऊन जाण्याचा त्यांचा डाव असतो.

चीनला जाताता सिद्धूला सखी (दीपिका पदुकोण) भेटते. ती मुळची चीनची आहे आणि भारतात टेली शॉपर्स मिडीयामध्ये काम करत असते. चीनमध्ये जाताच सिद्धूची टक्कर होजोच्या साथीदारांशी होते. त्याच्या माणसांना चकवा देण्यात सिध्दूला यश येते. ताकदवान होजो सिध्दूवर भलताच चिडतो. एक दिवस सिध्दू त्याच्या तावडीत सापडतो. ‍त्याचा सामना करण्यासाठी सिध्दू कूंगफू शिकतो आणि शेवटी होजोला ठार मारतो.