चिंटी चिंटी बैंग बैंग
|
दिग्दर्शक - आर. डी. मलिक
अॅनिमेशन - शंतनू पाल
संगीत - जीत
वेळ - 80 मिनिट
'चिंटी चिंटी बैंग बैंग' हा एक अॅनिमेशन चित्रपट आहे. यामध्ये आशिष विद्यार्थी, महेश मांजरेकर, असरानी, अंजन श्रीवास्तव यांसारख्या कलाकारांनी आवाज दिला आहे. मुंग्यांच्या साम्राज्याची ही कथा आहे.
|
काळा राजा लाल साम्राज्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू करतो. लोहित (लाल राजकुमारी) आणि कृष्णा (काळा राजकुमार) यांचे प्रेमप्रकरण सुरू असते. त्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडते. काळा राजा आपल्या सहका-यांना (बेडूक, सरडा) घेऊन रणांगणात येतो. आणि मग.. पुढे काय होते ते जाणून घेण्यासाठी पाहा 'चिंटी चिंटी बैंग बैंग'
