'जाने कहॉं से आई है' ही राजेश (रितेश देशमुख) या गुजराती तरूणाची कथा आहे. लहानपणापासून त्याला सच्च्या प्रेमाची आस आहे. पण अजूनही त्याला त्याचे प्रेम सापडलेले नाही. केजीमध्ये असातना पिंकी शर्माशी त्याचे प्रेम जडले. पण त्या पिंकीने त्याचे ह्रदय भंग केले. बरेच प्रयत्न करूनही त्याचे कुणाशीच प्रेम जमत नाही. अखेरीस त्याला नताशा (सोनल सहगल) भेटते. त्याला वाटते की हीच माझी प्रिया.
देश (रसलान मुमताज) सुपस्टार आहे. त्यालाही स्वप्नातील राजकुमारीचा शोध घ्यायचा आहे. शुक्रावर रहाणारी तारा (जॅकलीन फर्नांडिस) सच्च्या प्रेमाच्या शोधात पृथ्वीवर येते आणि या सगळ्यांची दुनिया पार बदलून जाते. त्यानंतर काय घटना घडतात ते पडद्यावरच पहाणे औत्सुक्याचे ठरेल.