शनिवार, 24 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

टीम- द फोर्स

टीम द फोर्स सिनेगप्पा
निर्माता : मनोज चतुर्वेदी, संजय चतुर्वेदी
दिग्दर्शक : अजय चंडोक
गीतकार : शब्बीर अहमद, कंवर जुनेजा, प्रवीण भारद्वाज
संगीत : डब्बू मलिक
लेखक : युनूस सेजवाल
कलाकार : सोहेल खान, अमृता अरोरा, आरती छाब्रिया, यश टोंक, व्रजेश हिरजी, सयाजी शिंदे, कुलभूषण खरबंदा

IFM
या चित्रपटाचे नाव आधी 'जीत-फील द फोर्स ' असे होते. आता ते बदलून ’टीम - द फोर्स’ असे केले आहे. ती तीन मित्रांची कथा आहे. राज (सोहेल खान), यश (यश टोंक) व जस्सी (व्रजेश हीरजी) यांना संगीताच्या दुनियेत नाव कमवायचं आहे. त्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. पण त्यांना आपली गुणवत्ता दाखविण्याची संधीच मिळत नाहीये.

हे तिघेही पेईंग गेस्ट असलेल्या बाबा (कुलभूषण खरबंदा) यांच्यासह रहातात. बाबांना त्यांच्या संघर्ष पाहून फार वाईट वाटते. ते तिघांना मुलासारखे मानतात. मग बाबा स्वतःच त्यांना व्हिडीओ अल्बम बनविण्यासाठी पैसे देतात. त्यासाठी त्यांना गोव्यालाही पाठवतात. पण तिथे गेल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन रमन शेट्टी (सयाजी शिंदे) बाबाला धमकी देऊन पैशांची मागणी करतो.

हे तिघेही आपल्या ध्येयाची पूर्ती करतात काय?
ते खरोखरच गुणवान असतात काय?
रमन शेट्टीपासून बाबा स्वतःचा बचाव कसा करतात?
या सगळ्यासाठी 'टीम- द फोर्स' पहावा लागेल.