शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

डॅडी कूल

डॅडी कूल सिनेगप्पा
बॅनर : मारुति इंटरनेशनल
निर्माता : अशोक ठाकरिया, इंद्र कुमार
दिग्दर्शक : के मुरली मोहन राव
संगीतः राघव सच्चर
कलाकार : सुनील शेट्टी, आरती छाब्रिया, आशीष चौधरी, ट्यूलिप जोशी, आफताब शिवदासानी, जावेद जाफरी, किम शर्मा, सोफिया चौधरी, राजपाल यादव, चंकी पांडे, सुहासिनी मुळे, प्रेम चोपड़ा, वृजेश हीरजी, शरद सक्सेना

IFM
स्टीवन (सुनील शेट्टी) मोठा लेखक बनू पहातोय. त्याच्या वडिलांचा मृत्यू झालाय. वडिलांना इतमामात निरोप द्यायचा त्याचा मानस आहे. त्यासाठी शानदार शवपेटी बनवायला टाकतो. कारागिर त्याच्याकडे पेटी पाठवून देतो, पण भलत्याचेच शव भरून. मग ट्रॅजेडीची कॉमेडी होऊन जाते.

या अंत्यसंस्काराला अनेक जण जमतात. त्या प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी कहाणी आहे. स्विवनचा लहान भाऊ ब्रायन (आशीष चौधरी) फार काही कमवत नाही. आपली आई आपल्याजवळ राहू नये असे त्याला वाटते. कारण तिला आणि तिच्या कुत्र्यांना पोसण्याइतका पैसा आपल्याकडे नाही, असे त्याचे म्हणणे आहे. स्टिवनची बायको नॅसी (आरती छाब्रिया) आपली सासू (सुहासिनी मुळ्ये) हिच्याबरोबर राहू इच्छित नाही. शिवाय सासूरवाडीची प्रॉपर्टी पिंटो (विजय पाटकर) या एजंटच्या सहाय्याने ती विकू पहातेय. मायकल (आफताब शिवदासानी) मारियावर (ट्युलिप जोशी) मरतोय. पण होणार्‍या सासर्‍यांना भेटायला घाबरतोय. जिम हाही (वृजेश हिरजी) मारीयावर मरतोय. या प्रसंगी तोही तिच्यावर इम्प्रेशन मारण्याचा प्रयत्न करतोय.

जेनी (किम शर्मा) हिला आपला पती कार्लोसचे (जावेद जाफरी) हॉट मॉडेल आयशाशी (सोफी चौधरी) अफेयर आहे, असा संशय आहे. ब्लॅकमेलर एंड्रयूकडे (राजपाल यादव) मृत लेजारसची (शरत सक्सेना) काही गुपिते आहेत. त्याद्वारे तो पैसा कमवू पहातोय. या सगळ्या माध्यमातून हास्यनिर्मिती होते.