1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
  6. डेव्हिड: आगामी चित्रपट

David: Movie Preview | डेव्हिड: आगामी चित्रपट

बॅनर : रील लाइफ एंटरटेनमेंट प्रा.लि., गेटअवे फिल्म्स
निर्माता : बिजॉय नाम्बियार, शारदा त्रिलोक
दिग्दर्शक : बिजॉय नाम्बियार
कलाकार : नील नितिन मुकेश, विक्रम, विनय वीरमानी, तब्बू, ईशा श्रावणी, मोनिका डोगरा, लारा दत्ता
प्रदर्शन तारीख: १ फेब्रुवारी २०१

PR
PR
चित्रपटाचे कथानक तीन डेव्हिडचे आयुष्य, तीन दुनियेतील विभिन्न भागात व तीन वेगवेगळ्या कालखंडात दाखवण्यात आले आहे.

१९७५ लंडन: ३० वर्षीय डेव्हिड खुंखार गुंड इकबाल गनी याचेसाठी काम करतो. इकबाल तेथे राज करतो व संपूर्ण आशियन समुदायावर त्याचा दरारा आहे. डेव्हिडची नजर आहे ती गनी याच्या साम्राज्यावर. मात्र एक अनपेक्षित घटना त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकते.

PR
PR


१९९९ मुंबई: १९ वर्षीय डेव्हिड एक युवा संगीतकार आहे. मनमौजी डेव्डिड रंगतदार आयुष्य घालवत असतो. मात्र त्याच्या कुटुंबास राजकारणाच्या दलदलीत खेचण्यात येते. या घटनेचा डेव्हिडच्या आयुष्यावर आमुलाग्र परिणाम होतो आणि त्याच्या आयुष्यातील शांती भंग पावते.
PR
PR


२०१० गोआ: व्यवसायाने कोळी असलेला ४० वर्षीय डेव्हिड गोव्यातील एका गावांत वास्तव्य करतो. मुकबधीर रोमा नावांच्या मुलीवर तो प्रेम करत असतो. मात्र रोमा दहा दिवसांनी तिचा बेस्ट फ्रेंड पीटर सोबत लग्न करणार असते आणि डेव्हिड समोर हे मोठे आव्हान असते.

तिनही डेव्हिडला आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी पाऊल उचलणे आवश्यक आहे. कथानकाचे थ्रीलही यातच आहे. चित्रपटात डेव्हिड नावासोबत तीन आयुष्य जोडल्या गेली आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा