तेरा क्या होगा जॉनी
IFM |
दिग्दर्शक : सुधीर मिश्रा
संगीत : पंकज अवस्थी, अभिषेक रे, अली अजमत
कलाकार : नील नितीन मुकेश, सोहा अली खान, शहाना गोस्वामी, करण नाथ, सौरभ शुक्ला, सिकंदर अग्रवाल, विजय मौर्या, केके मेनन.
’तेरा क्या होगा जॉनी’ बऱ्याच दिवसांपासून तयार आहे, पण काही कारणांमुळे रिलीज झाली नाही. 17 डिसेंबर रोजी या चित्रपटाला रिलीज करण्यात येणार आहे. हा चित्रपट एक थ्रिलिंग ड्रामा आहे, ज्याची कथा व दिग्दर्शन सुधीर मिश्रा आहे. मुंबईमध्ये प्रेम, लाच, धोका, वासना आणि आशा सारख्या शब्दांची नवीन परिभाषा काय आहे, हे या चित्रपटात दर्शविले आहे.
'इंडिया शायनिंग ड्रीम'चा परवेझ (नील नितीन मुकेश)ला एक भाग बनायचे आहे. लवकरात लवकर अमीर कसे व्हायचे, हे त्याला कळत नाही. तो दिव्या (शहाना गोस्वामी)शी प्रेम करतो, जी भ्रष्ट पोलिस ऑफिसर चिपले (केके मेनन)ची बायको आहे. चिपले चुकीच्या पद्धतीने कमावून ठेवलेले पैसे एका फ्लॅटमध्ये लपवून ठेवतो, ज्याला लंपास करण्याची योजना परवेझ बनवतो. त्याच्या ह्या निर्णयामुळे त्याच्या व कॉफी डिलिव्हरी बॉय (सिकंदर अग्रवाल)च्या जीवनात हलचल होते.
IFM
