निर्माता : भरत शाह दिग्दर्शक : सतीश कौशिक गीत : समीर संगीत : सचिन, जिगर कलाकार : रसलान मुमताज, शीना शाहबादी, सतीश कौशिक, सुष्मिता मुखर्जी, रजत कपूर, नीना गुप्ता, अनुपम खेर
'टिन एज प्रेग्नन्सी' अर्थात पौगंडावस्थेत गर्भारपण हा प्रश्न हल्ली ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात भेडसावतो आहे. 'तेरे संग' यावरच आधारीत आहे.
माही ही दिल्लीत रहाणारी श्रीमंत कुटुंबातली पंधरा वर्षाची मुलगी आहे. ती अर्थातच सुंदर आहे. सगळ्या सुख-सुविधा तिच्या पायाशी लोळण घेताहेत. त्याचवेळी कबीर हा सतरा वर्षाचा मुलगा एका छोट्या शहरात रहातोय. समाजाल्या खालच्या वर्गात रहाणारा हा मुलगा अहंकारी आणि बंडखोर प्रवृत्तीचा आहे.
IFM
माहि व कबीर यांची एकदा भेट होते आणि दोघेही दोस्त बनतात. माहीला छोट्या शहरातील जीवन आवडते, तर कबीरला ओढ असते महानगरी जीवनाची.
मग एकदा नववर्षाच्या पार्टीत ते एकमेकांच्या जरा जास्तच जवळ येतात आणि त्यातून माही गर्भवती होते. यातून निर्माण होणारे प्रश्न नि संघर्ष हा या चित्रपटाचा विषय आहे.