निर्माता - रोहन सिप्पी, केशव प्रकाश दिग्दर्शक - कुणाल रॉय कपूर कलाकार - कोंकणा सेन शर्मा, शेरनाज़ पटेल, ईरा दुबे, आनंद तिवारी, विवेक, सत्चित पुराणिक, नमित दास, आनंद तिवारी, शिवानी
ही 2006 मधील घटना आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती जॉर्ज बुश भारत दौ-यावर आले होते. त्यांच्या दौ-याचा मिनीट - मिनीट कार्यक्रम आखण्यात आला आहे. पण, राष्ट्रपतींच्या मनात तिव्र इच्छा दाटून येते. तीस वर्षापेक्षा कमी वयाच्या एक भारतीयाशी ते हात मिळवू इच्छितात.
भारत आणि चीनमध्ये युवकांची संख्या जादा असल्याने हे दोन देश पुढील महासत्ता होणार आहेत हे राष्ट्रपतींना माहित आहे. त्यामुळे ते या भविष्याला स्पर्श करण्याची त्यांची इच्छा असते.
तो युवक कोण असेल? यासाठी एक पीआर एजन्सी सेवेची मदत घेण्यात येते. आधुनिक भारताचा चेहरा असणा-या युवकाचा शोध घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात येते. 'जेनिथ पब्लिक रिलेशन' चे मालक सामंथा पटेल आणि त्यांचे सहाय्यक रितू जॉनसन हे दोघे मिळून पुर्ण भारतभर फिरून 6 युवकांची निवड करतात. त्यांचा परीचय पुढीलप्रमाणे आहे -
कपिल देव : केवळ क्रिकेटपटूच नाही तर भारतातील सर्वांत मोठे स्टॉक ब्रोकर आहेत.
रमेश एस : माइक्रोसॉफ्टमधील हे सॉफ्टवेयर गुरु आहेत. मुलींना पटवणे आणि डेटिंगवर जाण्याच्या टिप्स ते वर्तमानपत्रातून घेतात.
रोहित : लोकांचे उच्चारण सुधारण्यासाठी हे प्रशिक्षण देतात. हे स्वत:ला टॉम म्हणवून घेणे पसंत करतात.
माया रॉय : या युवा उपन्यासकार आहेत आणि स्वत:ला थोडे जास्तच गांभिर्याने घेतात.
अर्चना कपूर : ही श्रीमंताची मुलगी आहे. आपल्याला पेरिस हिल्टन समजते. भारतातील सर्वांत मोठ्या लिपस्टिक कंपनीची ही मालकीण आहे.
अजय कार्लेकर : हा सामाजिक कार्यकर्ता आहे. अमूल सारखा व्यवसाय करण्याचा त्याचा मनोदय असतो. याला इंग्रजी आवडत नाही.
ही युवा मंडळी युद्धभूमीवर एकत्र येतात. विजेत्याला राष्ट्रपती जॉर्ज बुश यांच्याशी हात मिळवण्याची संधी मिळणार आहे. त्यांची अनेक फे-यांमध्ये परीक्षा होणार आहे. विजेता बनण्यासाठी सगळीच कंबर कसतात.