शनिवार, 10 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

दसविदानिया

दसविदानिया
निर्माता- विनय पाठक, आजम खान
दिग्दर्शक- शशांत शाह
संगीत- कैलाश खेर
कलाकार- विनय पाठक, रजत कपूर, नेहा धूपिया, सौरभ शुक्ला, रणवीर शौरी, सुचित्रा पिल्लई, सरिता जोशी

अमर कौल(विनय पाठक) छत्तीशीच्या उंबरठ्यावर असून मुंबईचा रहिवाशी आहे. अमरला एकाकी राहणे पसंत असून थोडा लाजाळू स्वभावाचा आहे. तो स्वत:ला अतिशय बावळट माणूस समजत असल्याने स्पर्धेत टिकाव धरू शकेल, असे त्याच्याकडे काहीच नाही. समाजातील तो एक साधा माणूस आहे.

आपल्या आईसोबत राहणार्‍या अमरला शेजारपाजारचे लोकही ओळखत नाहीत. दररोज उठल्यानंतर अमर त्यांच्या कामांची यादी तयार करतो व पुन्हा झोपी जातो. हेच त्याचे रूटीन बनले आहे. कुशीच त्याचे घेणे देणे नसून अशाच जगण्यात त्याला आनंद आहे.

एके दिवशी अमरला कळते की, त्याच्या जीवनाचे शेवटचे तीनच महिने शिल्लक आहे. त्यानंतर हताश न होता शेवटच्या दिवसात राहिलेल्या कामांची यादी बनवतो. त्या यादीत त्याने त्याच्या शाळेतल्या मित्रांना भेटणे व पेंडिंग राहिलेल्या काम पूर्ण करणे या गोष्टीना प्राधान्य दिले असते.

अमर शेवटच्या दिवसांमध्ये कामे झटपट उरकून टाकतो की, तेच काम काही लोक संपूर्ण आयुष्यात करू शकत नाही. अरशद सईदने चित्रपटाची कथा लिहिली आहे. त्यात ट्रेजेडीत कॉमेडी करण्याचा अल्पसा प्रयत्न करण्यात आला आहे.