निर्माता - शैलेन्द्र आर. सिंह दिग्दर्शक - अनिल सीनियर कलाकार - राहुल बोस, कोंकणा सेन शर्मा, इरफान खान, राहुल खन्ना, सोहा अली खान, पायल रोहतगी
'दिल कबड्डी' हे चित्रपटाचे नाव जगावेगळे वाटते ना. शैलेंद्र आर. सिंह निर्मित या चित्रपटाचे नाव पहिल्यांदा 'अर्बन तडका' असे ठेवण्यात येणार होते. त्यानंतर 'बबलगम' ठेवण्याचा विचार झाला आणि नंतर 'दिल कबड्डी' हे नाव ठेवण्यात आले.
IFM
या चित्रपटात काम करणा-या राहुल बोसलाही हे नाव अजब वाटले. यापूर्वी त्याच्या अभिनीत ‘झंकार बीट्स’ चे नावही पसंत नव्हते. पण, प्रेक्षक जेव्हा चित्रपट पहाण्यासाठी येतात तेव्हा नाव विसरून चित्रपटामध्ये गुंग होतात. पण, प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्यासाठी चित्रपटाच्या नावाचेही तितकेच महत्व आहे.
'दिल कबड्डी' च्या दिग्दर्शकाने हा चित्रपट मेट्रो शहरतील लोकांसाठी बनविला आहे. कारण यातील घटना त्यांच्या जीवनाशी निगडीत अशा आहेत. शहरात रहाणा-या दोन जोडप्यांची ही कथा आहे. मौज-मस्ती करण्यासाठी ते विवाहबंधनात अडकू इच्छित नाहीत. हे नाते चित्रपटात कॉमेडी पध्दतीने मांडण्यात आले आहे.