सोमवार, 16 फेब्रुवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By अभिनय कुलकर्णी|

दिल बोले हडिप्पा

शाहिद कपूर
बॅनर : यशराज फिल्म्स
निर्माता : आदित्य चोपड़ा
दिग्दर्शक : अनुराग सिंह
गीतकार : जयदीप साहनी
संगीत : प्रीतम चक्रवर्ती, जूलिय
रिलीज डेट : 18 सप्टेंबर 2009
कलाकार : शाहिद कपूर, रानी मुखर्जी, शेर्लिन चोप्रा, पूनम ढिल्लो, अनुपम खेर, राखी सावंत, व्रजेश हिरजी.

वीरा (राणी मुखर्जी) एका छोट्या गावात रहाणारी 'चुलबुली' मुलगी आहे. तिची स्वप्न बरीच मोठी आहेत. ती एका स्थानिक थिएटर ग्रुपमध्ये काम करते आहे. पण तेंडुलकर आणइ धोनीसमवेत क्रिकेट खेळायची तिची इच्छा आहे.

रोहन (शाहिद कपूर) इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट टीमचा कर्णधार आहे. तो एक चांगला खेळाडू आहे. भारतात त्याच्या वडिलांची टीम एका स्पर्धेत गेल्या आठ वर्षांपासून सतत पराभव पत्करते आहे. आपल्या वडिलांच्या टीमला विजय मिळवून देण्यासाठी रोहन भारतात येतो.

वीरा ज्या गावात रहाते, तिथे मुली क्रिकेट खेळत नाही. मुलांसमवेत क्रिकेट खेळता यावे, म्हणून वीरा नकली दाढी आणि पगडी घालते. चांगल्या खेळामुळे तिला रोहनच्या टीममध्ये स्थान मिळते. आता वीर कौर बनते वीर प्रताप सिंग.

यानंतर वीर, रोहन आणि वीरा यांची गमतीदार यात्रा सुरू होते. यात गंमत तर आहेच, पण विनोद आणि संगीतानेही ही यात्रा नटलेली आहे. पंजाबतल्या हिरव्यागार वातावरणाची त्याला पार्श्वभूमी आहे. या कथेला एका ठिकाणी वळण मिळते आणि मग प्रेक्षकही म्हणतात, ‘हडिप्पा’.