दिवाळीत खमंग चित्रपटांचा ''फराळ''
|
|
|
गेल्या काही महिन्यांपासून हवा होत असलेला मधुर भांडारकर यांचा 'फॅशन' हा चित्रपटही याचदिवशी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि कंगना रानावतबरोबर मुग्धा गोडसे हा नवा मॉडेलिंगमधला चेहरा दिसणार आहे. मधुर भांडारकर यांनी या चित्रपटाचा जोरदार प्रचार केला आहे. मोठा गाजावाजा होऊन प्रदर्शित होणारा त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.
|
दिवाळीत यशराज फिल्म्सने प्रदर्शित केलेले चित्रपट हिट झाले आहेत. यावेळेला त्यांचा 'रोडसाइड रोमियो' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. डिज्नी स्टुडियोच्या मदतीने त्यांनी हा चित्रपट केला आहे. तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणारा हा चित्रपट एनिमेटेड आहे. मात्र, प्रेक्षक पैसे खर्च करून एनिमेशन चित्रपट बघतील का? हा प्रश्न आहे.
