धोबी घाट : मुंबई आणि मुंबईकरांची कथा
बॅनर : आमिर खान प्रॉडक्शन्स निर्माता : आमिर खान, किरण राव दिग्दर्शक : किरण रावकलाकार : प्रतीक, मोनिका डोगरा, कीर्ति मल्होत्रा, आमिर खानरिलीज डेट : 21 जानेवारी 2011 आमिर खानला जेव्हा त्याची पत्नी किरण रावने सांगितले की तिने एक कथा तयार केली आहे, तर आमिर एकदम घाबरला कारण त्याला असे वाटत होते की जर स्क्रिप्ट खराब आहे असे म्हटले तर त्याचा प्रभाव किरण आणि त्याच्या वैवाहिक संबंधांवर नक्कीच पडेल. त्याने किरणाला सांगितले की तो कुनूर जाऊन मंसूर खान सोबत स्क्रिप्ट ऐकणे पसंत करेल. जेव्हा किरणने मंसूर आणि आमिरला स्क्रिप्ट ऐकवली तर दोघेही आश्चर्यचकित झाले, आणि आमिरने लगेचच चित्रपटाचा निर्माता बनण्यास आपली सहमती दिली.
मुंबई शहर आपल्यात एक अनोखे आहे. येथे हजारो लोक स्वप्न घेऊन येतात. या शहरावर बरेच चित्रपट तयार झाले आहे. तसेच किरणच्या चित्रपटात मुंबईबद्दल बरेच काही आहे. चित्रपटाची कथा आहे शहरात राहणाऱ्या चार लोकांची, जे वेग वेगळे पार्श्वभूमीहून आलेले आहे. हे चारीजण एकमेकांशी आपसात भेटतात आणि त्यामुळे त्यांचे जीवन एकदम बदलतं.
मुंबईत पावसाच्या झडीत टॅक्सीच्या आतून एक व्हिडिओ कॅमेरेच्या माध्यमाने शहराला शूट करण्यात येत असते. कॅमेरेच्या मागे आहे एक लाजाळू मुलगी यास्मीन (कीर्ती मल्होत्रा) असते. टॅक्सी ड्रायव्हरशी जेव्हा ती बोलणे सुरू करते तेव्हा तिला हे समजते की ते दोघेही उत्तर प्रदेशातील आहे आणि दोघांचे शहर एकदमच जवळचे आहे. यामुळे दोघांमध्ये आत्मीयता निर्माण होते.
शाई (मोनिका डोगरा) मुंबईत एका बँकेत काम करत असते. तिची भेट अरुण (आमिर खान)शी होते जो एक पेंटर आहे. अरुण आणि शाई एक रात्र सोबत काढतात. या घटनेबाबत अरुण काहीच बोलायला तयार नसतो आणि शाई या घटनेला विसरायला तयार नसते. पुढच्या दिवशी दोघेही आता जीवनात कधी भेटणार नाही म्हणून आपापल्या मार्गाला लागतात.