शुक्रवार, 9 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

पेईंग गेस्ट

पेईंग गेस्ट सिनेगप्पा
निर्माता : सुभाष घई, राजू फारुकी
दिग्दर्शक : पारितोष पेंटर
गीत : शब्बीर अहमद, जलीस शेरवानी
संगीत : साजिद-वाजिद
कलाकार : श्रेयस तळपदे, सेलिना जेटली, आशीष चौधरी, रिया सेन, जावेद जाफरी, नेहा धूपिया, चंकी पांडे, सायली भगत, वत्सल सेठ, जॉनी लीवर, पेंटल, असरानी.

IFM
सुभाष घई गेल्या काही दिवसांपासून छोट्या बजेटचे चित्रपट आणताहेत. याचे दिग्दर्शन ते नवोदितांकडे सोपवत आहेत. आता त्यांचा 'पेईंग गेस्ट' हा नवा चित्रपट येतोय. याचे दिग्दर्शन 'धमाल' ची पटकथा लिहिणारा पारितोष पेंटर करतोय.

घर या विषयावर अनेक विनोदी चित्रपट आतापर्यंत येऊन गेले आहेत. पेईंग गेस्ट हीच कथा पुन्हा एकदा विनोदी पद्धतीने पुढे आणतोय.

श्रेयस तळपदे, जावेद जाफरी, आशीष चौधरी व वत्सल सेठ हे चार 'हॅपी गो लकी' युवक असतात. त्यांना सध्या भाड्याने घर पाहिजे आहे. पण तिथे त्यांना अनेक कटकटींचा सामना करावा लागतोय. घराच्या शोधात ते बल्लू (जॉनी लिव्हर) या मालकाला भेटतात. त्याच्या घरात पेईंग गेस्ट म्हणून रहाण्याचा त्यांचा इरादा असतो. पण बल्लू बेरकी असतो. तो त्यांच्यापुढे एक अट टाकतो. या मुलांना तो दाम्पत्याच्या रूपातच घरी ठेवायला तयार असतो. आता बायको कुठून आणायची असा प्रश्न या चार युवकांपुढे पडतो. आणि मग पेईंग गेस्ट म्हणून रहाण्यासाठी ते काय काय शक्कल लढवतात ते यात पहायला मिळेल.