शुक्रवार, 2 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

प्रिन्स

प्रिन्स रेणु तौरानी
निर्माता : रेणु तौरानी, कुमार एस. तौरान
दिग्दर्शक : कूकी वी गुलाट
संगीत : सचिन गुप्त
कलाकार : विवेक ओबेरॉय, अरुणा शील्ड्‍स, नंदना सेन, नीरू सिंह, संजय कपूर

प्रिन्स हा वेगवान एक्शन थ्रिलर चित्रपट असल्याचा निर्मात्यांचा दावा आहे. रंजन आणि वेगवान गती यामुळे प्रेक्षक खुर्चीला खिळून रहातील असे त्यांचे म्हणणे आहे.

त्याच्या कथेवरून तरी हा चित्रपट 'बोर्न आयडेंटिटी' या इंग्रजी चित्रपटाची हिंदी आवृत्ती वाटतो आहे. प्रिन्स हा चोर आहे. सकाळी उठल्यानंतर त्याला त्याच्या डाव्या हातावर जखम दिसते आणि त्याची सगळी स्मरणशक्ती निघून जाते.

मग तो स्वतःचा शोध घेतो तेव्हा त्याला कळते की त्याचे नाव प्रिन्स आहे. सारंग नावाच्या एका माणसासाठी तो काम करतो. त्याची माया नावाची गर्लफ्रेंडही आहे.

त्याच्या मागे सीक्रेट सर्व्हिस ऑफ इंडिया, सीबीआय यांच्यासह अनके गुंडही लागले आहेत. त्याने अशी एक चोरी केली आहे, की ती मानव जातीसाठी धोकादायक आहे. या गोष्टीशी निगडीत त्याची स्मरणशक्तीही आहे. या सगळ्यातून तो कसा बाहेर पडतो यासाठी प्रिन्स पहावा लागेल.