रविवार, 28 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

फिर!

फिर
निर्माता : एएसए प्रोडक्शन्स एंड एंटरप्राइजेस प्रा.लि.
निर्देशक : गिरीश धामीजा
संगीत : राघव सचर, शरीब-तोषी
कलाकार : रजनीश दुग्गल, अदा शर्मा, रोशनी चोप्रा

WD

कबीर मल्होत्रा (रजनीश दुग्गल) एक डॉक्टर आहे. कबीर, सिया (रोशनी चोप्रा)शी प्रेम करत असतो आणि तिच्याशी त्याला लग्न करायचे असते. शानदार करियर आणि खुशाल वैवाहिक जीवन, यापेक्षा जास्त एक पुरुष काय इच्छितो ? पण कबीरचे हे स्वप्न जास्त दिवस कायम राहत नाही आणि एक दिवस अचानकच त्याच्यावर मुसीबत येते. त्याची बायको सिया गायब होते. केव्हा, कुठे आणि कशी, या सर्व गोष्टींचे उत्तर करीबला सापडत नाही.

WD


दुखी कबीरची दिशा (अदा शर्मा) मदत करते. सियाचा जेवढा ते शोध घेतात तेवढेच ते संकटात पडतात. सियाच्या गायब होण्यामागे काय कारण आहे? दिशा कोण आहे आणि ती कबीरची मदत का म्हणून करते? या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळविण्यासाठी रोमांच आणि सस्पेंस असलेले चित्रपट ‘फिर’मध्ये मिळतील.

WD


दिग्दर्शकाबद्दल माहिती :
गिरीश धामीजाने बऱ्याच चित्रपटांत संवाद लिहिले आहे खासकरून मुकेश आणि महेश भट्टचे बॅनर विशेष फिल्म्ससाठी. जख्म, दुश्मन, कसूर, राज, गँगस्टरचे संवाद विशेषकरून प्रशंसनीय आहे. नंतर ते विक्रम भट्टबरोबर जुडले आणि त्यांच्या चित्रपटांचे संवाद लिहिणे सुरू केले. दिग्दर्शक म्हणून त्यांनी प्रियंका चोप्रा आणि अर्जुन रामपालला घेऊन ‘यकीन’ (2005) नावाचे थ्रिलर चित्रपट तयार केले होते, जे अपयशी ठरले. 6 वर्षानंतर एकवेळा ते परत निदर्शनाच्या क्षेत्राकडे वळले असून त्यांनी ‘फिर’ नावाचे थ्रिलर चित्रपट निर्देशित केले आहे.