1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट

''फिराक'' दंगलीनंतरचे वास्तव

फिराक दंगलीनंतरचे वास्तव
IFM
बॅनर - परफेप्ट पिक्चर कंपनी
दिग्दर्शक - नंदिता दास
संगीत - रजत ढोलकिया, पीयूष कनोजीया
कलाकार - नसरुद्दीन शाह, परेश रावल, रघूवीर यादव, दीप्ती नवल, संजय सूरी, शहाना गोस्वामी, टिस्का चोप्रा

'फिराक' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री नंदिता दासने दिग्दर्शनामध्ये पाऊल ठेवले. हा चित्रपट भारतात प्रदर्शित झालेला नाही पण, टोरॅंटो चित्रपट महोत्सव, लंडन चित्रपट महोत्सव यांसाख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटांचे कौतुक झाले आहे.

IFM
चित्रपटामध्ये 24 तासांची कथा दाखविण्यात आली आहे. 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीनंतरचे हे 24 तास आहेत. या जातीय दंगलीतमध्ये तीन हजारापेक्षा जास्त मुस्लिम मारले गेले. हजारो बेघर झाले. अनेक महिलांच्यावर बलात्कार झाले. सत्यघटनेबरोबरच काही ठिकाणी काल्पनिक घटनांची जोडही देण्यात आली आहे.


IFM
या दंगलीनंतर त्याचे सामान्य माणसावर काय परिणाम झाले, याचे चित्रपट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
काही लोक बळी पडले, काही संतप्त होते तर काही गप्प होते. हिंसा पाहणारी एक मध्यमवर्गीय महिला घाबरून
आपल्या घराचे दरवाजे लावून घेते आणि नंतर तिला आपलीच लाज वाटते. शालेय परीक्षा भीतीच्या वातावरणात पार
पडतात. अशा काही घटना यामध्ये आहेत.


About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा