फॅशन : ग्लॅमर जगाचा आरसा
|
दिग्दर्शक - मधुर भांडारकर
संगीतकार - सलीम-सुलेमान
कलाकार - प्रियांका चोप्रा, कंगना, मुग्धा गोडसे, आरबाज खान, समीर सोनी, अर्जुन बाजवा, किट्टू गिडवानी
मधुर भांडारकर यांचे चित्रपट नेहमीच समाजाचा आरसा राहिलेले आहेत. मी माझ्या चित्रपटातून वास्तव मांडण्याचा प्रयत्न करतो, असे त्यांचे म्हणणे असते. यावेळी मधुर यांनी फॅशनचे जग निवडले आहे.
|
छोट्या शहरात राहणा-या मेघना माथुर (प्रियांका चोप्रा) या मुलीची ही कथा आहे. आपण मोठे होण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्याचा तिचा प्रयत्न असतो. पण, रूढी-परंपरेला चिटकून असणा-या कुटुंबातील असते. प्रसिद्धी आणि झगमगाट तिला फॅशनच्या जगताकडे आकर्षित करतो.
|
कंगनाने शोनाली गुजराल नामक भूमिका रंगवली आहे. प्रसिद्ध मॉडल गीतांजली नागपाल यांना समोर ठेवून ही भूमिका दाखविण्यात आली मुग्धा गोडसेने जेनेट ही भूमिका केली आहे. जेनेटला फॅशनजगतात जास्त प्रसिद्धी मिळालेली नाही. मधुर यांनी फॅशनजगातील बारीक-सारीक गोष्टींचा अभ्यास करून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 29 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.
