IFM बॅनर - बांद्रा वेस्ट पिक्चर्स निर्माता - राज एरासी, जियुलिया अचीली, राजा मेनन कथा, पटकथा - दिग्दर्शक - राजा मेनन कलाकार - नसीरुद्दीन शाह, विजय राज, अर्जुन माथुर, वायलेंटी प्लेसिडो, तनिष्ठा चटर्जी‘बारह आना’ मुंबईत राहणा-या मित्रांची कथा आहे. ड्रायवर शुक्ला (नसीरूद्दीन शाह) चे वय झाले आहे. पोट भरण्यासाठी त्याला स्वत: कमवावे लागते. वॉचमन यादव (विजय राज) तीस वर्षाच्या आसपास आहे आणि त्याचा व्यवहार रहस्यमय आहे. वेटर अमन (अर्जुन माथुर) आखडू असतो. वेगवेगळे स्वभाव असले तरी तिघेजण चांगले मित्र असतात. IFM जीवनाच्या एका वळणावर वॉचमन यादवचे नाव एका गुन्ह्यात गोवले जाते. कमी वेळेत पैसे कमाविण्यासाठी तो धोका पत्करतो. तो आपल्या बरोबर मित्रांनाही गुन्हेगारीसाठी प्रवृत्त करतो. नवे काम आणि पैशाच्या मोहापायी सगळ्यांच्याच स्वभावात फरक पडतो आणि मग उंदीर-मांजराचा खेळ सुरू होतो. परिस्थिती सगळ्यांच्या हाताबाहेर जाते आणि मागे वळणे त्यांना शक्य होत नाही. ‘बारह आना’ हा एक एक हलका-फुलका चित्रपट आहे. यामध्ये इटालियन अभिनेत्री वायलेंटी प्लेसिडोचा सहभाग आहे. अनेक आंतर्राष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये हा चित्रपट दाखविण्यात आला आहे. जून मध्ये न्यूयॉर्कमध्ये होणा-या 'म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट' च्या चित्रपट महोत्सवामध्येही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.