बेनेगलांचा 'वेलकम टू सज्जनपूर'
|
पटकथा, दिग्दर्शक - श्याम बेनेगल
संगीत - शंतनू मोइत्रा
कलाकार - श्रेयस तळपदे, अमृता राव, रवी किशन, इला अरुण, दिव्या दत्ता, यशपाल शर्मा, राजेश्वरी सचदेव
सज्जनपुरात राहणारा महादेव समाजातील सुशिक्षित नागरिक आहे. कादंबरीकार बनण्याची त्याची इच्छा आहे. पोस्टाच्या बाहेर बसून तो अडाणी लोकांना पत्रे लिहून देण्याचे काम करतो. आपल्या या कामावर तो खूश आहे. आपल्या प्रतिभेचा वापर करून तो पत्रे लिहितो. त्याच्या या कामामुळे तो गावातही प्रसिद्ध आहे.
कमला ही सुंदर स्त्री त्याच्याकडे पत्र लिहून घेण्यासाठी येते. नोकरीसाठी मुंबईत गेलेल्या आपल्या पतीला तिला हे पत्र लिहायचे असते. कमलाला पाहून महादेवच्या मनात जुन्या आठवणी दाटून येतात. त्याला आठवते की, कमला नावाची मुलगी त्याच्याही वर्गात होती. ती त्याला आवडत असे. एक दिवस कमलाने त्याला सुंदर हस्ताक्षरात नोटस लिहण्यास सांगितले होते. या मोबदल्यात त्याने 'कीस' मागितला होता.
|

